Coronavirus: २४ तासांत देशभरात ९८ करोनाग्रस्त वाढले!

Coronavirus: २४ तासांत देशभरात ९८ करोनाग्रस्त वाढले!

CoronaVirus: गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे १०० नवे रुग्ण, आकडा ५९०वर!

जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशात करोनाग्रस्तांची संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशातील करोनाग्रस्तांची संख्या २५९ वरून २९८वर पोहोचली आहे. देशात २४ तासांत ९८ करोग्रस्तांची नोंद झाली आहे. तसंच  करोना व्हायरसमुळे एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय २२ करोनाग्रस्त रुग्णावर यशस्वी उपचार झाल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी देशातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन सरकारने केलं.

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढ आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हणून करोनाचा सामना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तसंच देशभरात आजपासून करोना चाचणी करण्यासाठी १११ लॅब सुरू झाल्या असल्याचं देखील आरोग्य मंत्रालयने सांगितलं.

आतापर्यंत जगभरातील करोनाग्रस्तांचा आकडा २ लाख ८७ हजार ३७९ वर पोहोचला आहे. त्यापैकी ११ हजार ९५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच ९२ हजार ५९२ करोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – Coronavirus: कनिकाच्या पार्टीमधल्या दोघांची टेस्ट आली निगेटिव्ह


 

First Published on: March 21, 2020 6:08 PM
Exit mobile version