विमानातच झाली महिलेची प्रसूती

विमानातच झाली महिलेची प्रसूती

संग्रहित फोटो

तुम्हाला कुणी सांगितले की विमानातच महिलेची प्रसूती झाली तर विश्वास ठेवाल? पण, ही घटना सत्य आहे. अबुधाबी – जकार्ता विमानामध्ये ही प्रसूती झाली आहे. इंडोनेशियाच्या या महिलेची प्रसूती विमानात झाली तरी महिलेवर सध्या अंधेरीतील रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. विमानात प्रसूती झाली असली तरी  काळजी करण्याचं काहीही कारण नाही. आई आणि बाळ दोन्ही देखील सुखरूप आहेत. इतिहादच्या विमानामध्ये ही प्रसूती झाली आहे. अबुधाबीवरून जकार्ताकडे जाणाऱ्या विमानामध्ये आज ( बुधवारी ) सकाळी इंडोनेशियाच्या महिलेची प्रसूती झाली. विमानामध्ये प्रसूती झाल्यानंतर विमान मुंबईकडे वळवण्यात आले. मुंबईतील छत्रपती विमानतळावर उतरल्यानंतर महिलेला अंधेरीतील सेव्हन हील रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, आई आणि बाळ सुखरूप आहेत.

…अन् तात्काळ हलली सूत्रं

महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर क्रु मेंबर आणि इतर महिला प्रवाशांच्या मदतीनं महिलेची प्रसूती करण्यात आली. दरम्यानच्या काळात वैमानिकानं एअर ट्राफिक कंट्रोलच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर एटीसीनं प्रकरणाचं गांभीर्य ओळखून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरवण्यास परवानगी दिली. यानंतर विमान कंपनी आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी महिलेला रूग्णालयात दाखल केलं. त्यानंतरच विमानं टेक ऑफ केलं.

First Published on: October 24, 2018 3:25 PM
Exit mobile version