दिल्लीतील कार अपघातात एका महिलेचा मृत्यू

दिल्लीतील कार अपघातात एका महिलेचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या कार अपघातातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.सोना देवी असं महिलेचं नाव आहे. मंगळवारी अंबुज गर्ग या डॉक्टराच्या कारनं तीन महिलांना उडवलं. त्यानंतर डॉक्टराला पोलिसांनी अटक केली. अंबुज गर्गनं तीन महिलांना उडवलं होतं. या महिला कामावरून घरी जात होत्या. त्यामध्ये दोन महिला जखमी झाल्या असून सध्या त्यांच्यावर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर सोना देवी यांचा रूग्णालयामध्ये नेताना मृत्यू झाला आहे. रानी झांशी फ्लायओव्हर जवळ हा अपघात झाला. त्यामध्ये दोन महिला जखमी तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी अंबुज गर्ग स्वत: गाडी चालवत होता. अपघातानंतर अंबुज गर्गची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्याच्या रक्तामध्ये दारूचा अंश सापडला नसल्याचे वैद्यकीय तपासतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले असून त्याचा आधार घेऊन हा अपघात झाला कसा? यावर प्रकार टाकला जाणार आहे.

First Published on: December 13, 2018 11:33 AM
Exit mobile version