बापरे! HIVग्रस्त महिलेच्या शरीरात २१६ दिवस राहिला कोरोना; ३२ वेळा बदलले रुप

बापरे! HIVग्रस्त महिलेच्या शरीरात २१६ दिवस राहिला कोरोना; ३२ वेळा बदलले रुप

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर अजून कायम आहे. यादरम्यान कोरोना व्हायरसचे बदलले रुप म्हणजे म्युटेशनमुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनेक रुग्णांमध्ये कोरोनाचे एखादे म्युटेशन, डबल म्युटेशन किंवा ट्रिपल म्युटेशन सापडल्याचे आपण ऐकले आहे. पण एका एचआयव्हीग्रस्त (HIV) महिलेमध्ये कोरोनाने ३२ वेळा रुप बदल्याची आश्चर्यकारक आणि हैराण करणारी घटना समोर आली आहे. याचा अर्थ असा की, या महिलेच्या शरीरात ३२ कोरोनाचे म्युटेशन आढळले आहेत. तसेच तिच्या शरीरामध्ये कोरोना व्हायरस २१६ दिवस होता. एचआयव्हीग्रस्त असूनही या महिलेने कोरोनावर जिंकायला दिले नाही आहे.

७ महिने कोरोनाशी लढा 

ही आश्चर्यकारक आणि हैराण करणारी घटना दक्षिण आफ्रिकेमधील आहे. एचआयव्ही सारखा गंभीर आजार असून ३६ वर्षीय महिला ७ महिने कोरोनाशी लढत होती. कोरोना व्हायरसने तिच्या शरीरात ३२ वेळा रुप बदलले. ‘मेडआरएक्स-४ जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात याचा खुलासा झाला आहे.

महिलेमुळे इतर लोकांना संसर्ग झाला?

महिलेच्या शरीरात १३ म्युटेशन (जेनेटिक उत्परिवर्तन) स्पाईक प्रोटीन आहे. हे प्रोटीन कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. तसेच १९ म्युटेशन असे आढळले, ज्यामध्ये व्हायरस बदलण्याची क्षमता होती. तसेच यापैकी महिलेच्या शरीरात कोरोनाची असे काही रुप होते, जे बाहेरच्या लोकांना झाले आहे की नाही याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही.

जर अशा प्रकारे रुग्ण आढळले तर एचआयव्ही आजारासह कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका अधिक वाढतो, अशा शक्यतेला अजून बळ मिळेल. कोणताही आजार असेल तर कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याला कमजोर करतो. अशा परिस्थितीत कोरोनासोबतची लढाई दीर्घकाळापर्यंत चालते आणि धोका जास्त असतो. या महिलेमध्ये हेच दिसून आले. मात्र या महिलेने कोरोना मात केली.

एका रुग्णांच्या शरीरात ३२ कोरोना म्युटेशन आढळल्याचे प्रकरण कधीच समोर आले नसते. कारण एचआयव्हीग्रस्त महिलेत कोरोनाची कोणतीही विशेष लक्षणे नव्हती. एचआयव्हीग्रस्त कोरोनाबाधित रुग्णांना समजण्यासाठीच्या शोधात ३०० जण सहभागी झाले होते. त्यापैकी ही एक महिला होती. या शोधादरम्यान महिलेच्या तपासणीत अनेक गोष्टी समोर आल्या. तसेच या शोधात चार असे लोकं समोर आले, ज्यांच्यामध्ये एक महिन्यापेक्षा जास्त काळासाठी कोरोना होता. परंतु त्यांच्यामध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नव्हती.


हेही वाचा – coronavirus : लसीकरण मोहिम थंडावल्यास देशात कोरोनाची तिसरी लाट येणार,आरोग्य तज्ज्ञांचा इशारा


 

First Published on: June 6, 2021 10:59 AM
Exit mobile version