लग्नाची अंगठी मोडून दिली पतीला जीवे मारण्याची सुपारी!

लग्नाची अंगठी मोडून दिली पतीला जीवे मारण्याची सुपारी!

नवी मुंबईत तिहेरी हत्याकांड

पूर्वीच्या काळी नवऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी पत्नी आपले मंगळसूत्र गहाण ठेवत होत्या. मात्र, याच्या अगदी विपरीत चित्र आंध्र प्रदेशमध्ये दिसले. हैदराबाद येथे आपल्या नवऱ्याला जीवे मारण्यासाठी एका पत्नीने चक्क स्वत:च्या लग्नाची अंगठी मोडून मारेकऱ्यांना सुपारी दिली. ही घटना आंध्र प्रदेशमधील विजयनगर जिल्ह्यात घडलीये. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी एका २२ वर्षीय वाय. सरस्वती नामक नवविवाहितेने पार्वतीपूरममधील गुरुगुबिली पोलीस स्टेशनला तक्रार केली. ती महिला तिच्या पतीसोबत थोटापल्ली येथील आयटीडीए पार्कजवळ फिरत असताना तीन अनोळखी इसमांनी तिचे दागिने चोरले आणि तिच्या पतीला ठार मारले. मात्र पोलिसांच्या तपासणीत या प्रकरणातील खरी बाजू पुढे आली. महिलेने केलेली तक्रार खोटी असून, तिनेच आपल्या पतीला जीवे मारण्याची सुपारी दिली होती. त्यासाठी तिने त्यांना आपले मंगळसूत्र विकून पैसे दिले होते.

आरोपी महिला सरस्वती हिने प्रियकर मधू शीवाच्या मदतीने पती गौरीशंकरला ठार मारण्याचा कट रचला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार मधू शीवा ह्याने सरसिपल्ली रामा नामक व्यक्तीला या कामाची सुपारी दिली होती. सरसिपल्ली रामा या व्यक्तीच्या नावावर खुनाचे अनेक खटले दाखल आहेत. या कामासाठी मधूने त्याच्यासोबत शिकणाऱ्या दोन मित्रांनादेखील बरोबर घेतले होते.

पोलिसांनी सांगितले की, सरस्वतीने मारेकऱ्यांना आठ हजार रुपये अॅडव्हान्स दिले होते. तर मधू शिवाने दहा हजार रुपये रोकड दिली होती. विजयनगरचे पोलीस अधिक्षक म्हणाले की, घटनेच्या ठिकाणी मारेकऱ्यांनी ऑटोरिक्षातून त्यांचा पाठलाग केला आणि ठरवल्या प्रमाणे एका स्पॉटवर त्यांनी गौरी शंकरच्या डोक्यावर एका लोखंडी वजनदार वस्तूने आघात केला. त्यामुळे गौरीशंकर जागच्या जागीच ठार झाला.

First Published on: May 9, 2018 1:25 PM
Exit mobile version