मॉलमध्ये महिला शिंकल्याने २६ लाखांचे सामान थेट गटारात

करोना संसर्गजन्य आजार असल्याने जगभरातील देशांनी त्याचा धसका घेतला आहे. चीन, इराण, इटलीनंतर अमेरिकेतही करोनाचा सर्वाधिक कहर सुरू आहे. सर्दी,खोकला, ताप ही फ्लूबरोबरच करोनाचीही प्राथमिक लक्षणे असल्याने संसर्गाच्या भीतिने अशा व्यक्तींपासून लोक दोन हात लांबच राहात आहेत. याचदरम्यान, अमेरिकेतील एका मॉलमध्ये सामान घेण्यासाठी गेलेली एका महिला शिंकली. त्यामुळे मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला .महिला करोनाग्रस्त असल्याचे समजून लोक सैरावैरा धावू लागले. महिलेच्या शिंकण्यामुळे सगळीकडे संसर्ग झाल्याचे समजून मॉलमधील दुकानदारांनी तब्बल २६ लाखाचे सामान थेट गटारात फेकले.
अखेर महिलेला अटक करण्यात आली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया येथे घडली आहे. वृत्तसंस्था सीएनएनने हे वृत्त दिले आहे. महिलेच्या शिंकण्यामुळे मॉल मधील ३५ हजार डॉलर म्हणजे २६ लाखांचे जेवणाचे सामान फेकून देण्याात आले. कारण हा सामान जिथे ठेवण्यात आले होते. त्याजवळच महिला शिंकली होती. महिला दुकानात शिंकतच आली होती. सध्याच्या वातावरणात तिचे वागणे गैरजबाबदार असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. तसेच महिला करोनाग्रस्त असावी असे वाटल्यानेच सामान फेकल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे. तसेच महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्यावर खटलाही चालवण्यात येणार ्सल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. महिला करोना पॉझिटीव्ह नव्हती तरीही तिची करोना चाचणी करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे.

First Published on: March 27, 2020 3:21 PM
Exit mobile version