कोरोना नाही तर ‘या’ आजाराने येत्या ६ महिन्यात ५ लाख लोकांचा जाणार बळी!

कोरोना नाही तर ‘या’ आजाराने येत्या ६ महिन्यात ५ लाख लोकांचा जाणार बळी!

जगभर कोरोनाने थैमान घातले असताना आसाममध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लूचा फैलाव जोरदार होताना दिसतोय. कोरोना महामारीच्या काळात आसाममधील आफ्रिकन स्वाइन फ्लूचा कहर थांबत नाही. तर दुसरीकडे येत्या ६ महिन्यात तब्बल ५ लाख लोकांचा मृत्यू होणार असल्याचे एक अभ्यासातून समोर आले आहे. मात्र तब्बल ५ लाख लोकांचा बळी हा कोरोनाने नाही तर एड्समुळे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संस्था (WHO) ने केलेल्या मॉडेलिंग अभ्यासानुसार, तसेच यूएनएड्सचा (UNAIDS) अंदाजावरून पुढील ६ महिन्यांत आफ्रिकेच्या उप-सहारान भागात एड्समुळे ५ लाख लोकांचा मृत्यू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास २००८ रोजी एड्समुळे मरण पावलेल्यांचा हा विक्रम तुटण्याची शक्यता नक्कीच असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, WHO आणि UNAIDS यांनी त्यांच्या अभ्यासानुसार असे सांगण्यात येत आहे की, २०१८ मध्ये २.५ कोटी लोकांना HIV झाला होता. त्यापैकी ६४ टक्के अँटीरेट्रोव्हायरस (ARV) थेरपीच्या उपचाराने बरे झाले होते. हा रिपोर्ट द टेलीग्राफमध्येही प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र आता कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहे. HIV क्लिनिकमध्ये अँटीरेट्रोव्हायरस थेरपी पुरविल्या जात नाहीत त्यामुळे हा धोका अधिक वाढू शकतो. एड्स, टीबी, मलेरिया यासारख्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी कोरोना विषाणू किती धोकादायक आहे. हे या अभ्यासातून दिसून येते. अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना कोरोनाचा त्रास होऊ शकत नाही, परंतु त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने जास्त आजाराच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असे WHOने म्हटले आहे.

दरम्यान, आफ्रिकेमध्ये HIV पसरण्याचा धोकाही वाढला आहे, कारण आफ्रिकेत कंडोमची कमतरता भासत आहे. याशिवाय एआरव्ही थेरपी, टेस्टिंग किट इत्यादींचीही कमतरता आहे. आफ्रिकेत एड्स किंवा एचआयव्ही ग्रस्त लोकांना वेळेवर एआरव्ही थेरपी घ्यावी लागते, असे देखील म्हटले जात आहे.


कोरोना नाही तर ‘या’ आजाराचे आसाममध्ये थैमान; ९ जिल्हात पसरला ‘हा’ व्हायरस
First Published on: May 14, 2020 5:59 PM
Exit mobile version