world most expensive fruit: जगातील सर्वात महागड्या फळांची किंमत वाचून चकीत व्हाल!

world most expensive fruit: जगातील सर्वात महागड्या फळांची किंमत वाचून चकीत व्हाल!

world most expensive fruit: जगातील सर्वात महागड्या फळांची किंमत वाचून चकीत व्हाल!

संपुर्ण जग हे वैविध्यपुर्ण गोष्टींनी नटलेलं आहे. निसर्गामुळे किंवा माणसामुळे जगामध्ये सतत नवीन बदल घडतात. काही दिवसांपुर्वी मध्य प्रदेशातील जबलपुरमध्ये एक आंब्याची फळबाग तुफान व्हायरल झाली होती कारण तो एक टाइयो नो टमॅगो नवाचा जपानी आंब्याची वैशिष्ट्यपूर्ण जात होती तसेच त्याची किंमती लाखोंच्या घरात होती. अशातच आता अनेक अशी फळे समोर आली आहेत ज्यांची किंमत वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.(world most expensive fruit: You will be amazed to read the price of the most expensive fruit in the world!)


जपान मधील रुबी रोमन अंगूरच्या विशिष्ट चवीने तसेच साइझमुळे याला लक्जरी फळांच्या श्रेणीत स्थान मिळाले आहे. हे अंगूर पिंगपाँग बॉल प्रमाणे मोठे असताता. तसेच याची किंमत तब्बल 8 लाख 17 हजारच्या घरात आहे. म्हणजेच एका अंगूरची किंमत 35 हजार इतकी ठरेल.

गौतम बुद्धांच्या आकारतील नासपती जगभरातील सर्वात महागड्या फळांमध्ये समाविष्ट आहेत. बुद्धा नाशपतीची लागवड करण्याची कल्पना चीनमधील एका शेतकऱ्याला सुचली होती. या नासपतीची किंमत 700 रुपये आहे.

जपानमध्ये कलिंगड चौकोनी आकारच्या लाकडी बॉक्समध्ये उगवले जाते. यामुळे कलिंगडचा आकार चौकोनी होतो. या विशेष आकारमुळे हा कलिंगड 60 हजार रुपयांच्या जवळ विकला जातो.


सेकाई ईची सफरचंद हा सर्वाधीक पौष्टीक तसेच महागड्या फळांच्या यादित गणला जातो. सेकाई ईची याचा जपानी भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास ‘जगातील सर्वश्रेष्ठ’ असा होतो. या फळाची लागवड करणारे शेतकरी याला मधात भिजवून धूतात तसेच हॅन्ड पॉलिनेशनचा वापर करतात. एका सफरचंदची किंमत 1600 रुपये आहे.



हे हि वाचा – Apple Watch:ॲप्पल वॉचने हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवला महिलेचा जीव



 

First Published on: July 6, 2021 4:10 PM
Exit mobile version