मोदींच्या मताशिवाय जगात कोणताही निर्णय घेतला जात नाही, अमित शहांकडून कौतुक

मोदींच्या मताशिवाय जगात कोणताही निर्णय घेतला जात नाही, अमित शहांकडून कौतुक

आज जगातील कोणतीही समस्या असो, जोपर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य येत नाही तोपर्यंत कोणत्याही समस्येवर जग अंतिम निर्णय घेत नाही, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले. देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा तयार करणाऱ्या पिंगली व्यंकया यांच्या गौरवानिमित्त आयोजित तिरंगा उत्सवाच्या कार्यक्रमात अमित शहा बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना शाह म्हणाले की, आज संपूर्ण जग भारताकडे आदराने बघत आहे. मोदींच्या नेतृत्त्वाखाली नव्या भारताचं स्वप्न पूर्ण होत आहे. २०१४-२०२२ या कालावधीत मोदींनी भारताची प्रतिष्ठा वाढवली. पंतप्रधान मोदी आपलं मत व्यक्त करत नाही तोवर जग कोणत्याही समस्येवर निर्णय घेत नाही. भारताचा असा गौरव व्हावा यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले आहे.


दरम्यान, आपण यावर्षी स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव साजरे करणार आहोत. त्यासाठी हर घर तिरंगा मोहीम सुरू कऱण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरात राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात येणार आहे. तसेच, सोशल मीडियावरील डीपीमध्ये तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे अनेक नायकांचे विस्मरण झाले आहे. त्या सर्वांची आठवण काढण्याची आणि त्यांचा गौरव करण्याची ही संधी असल्याचंही अमित शहा यांनी यावेळी सांगितलं.

First Published on: August 3, 2022 12:12 PM
Exit mobile version