Coronavirus Outbreak: मृत्यूच्या आकडेवारीत इटलीने चीनला मागे टाकले

Coronavirus Outbreak: मृत्यूच्या आकडेवारीत इटलीने चीनला मागे टाकले

जगात तिसरे महायुद्ध सुरु असल्याचा भास सध्या करोना व्हायरसच्या प्रभावामुळे होत आहे. चीनमधून सुरु झालेला करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता १९५ पैकी १७१ देशांमध्ये पोहोचला आहे. तर चीनमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते, पण आता इटलीचा आकडा वाढला असून चीनलाही त्यांनी मागे टाकले आहे. तर जगभरातील मृत्यूचा आकडा आता दहा हजारांच्या पुढे गेला आहे.

चीनमधील वुहान प्रांतात डिसेंबरमध्ये पहिला करोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर हा व्हायरस जगभर पसरला. सध्या चीनमध्ये मृताचा आकडा ३ हजार २४८, इटलीमध्ये ३ हजार ४०५, इराणमध्ये १,२८४ आणि स्पेनमध्ये ८३३ पर्यंत मृताचा आकडा पोहोचला आहे. तर त्यापाठोपाठ फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही हा आकडा शेकडोच्या घरात पोहोचला आहे. जगभरात आतापर्यंत जवळपास २ लाख ४७ हजार लोकांना करोनाची बाधा झाली असून १०,१७८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८६ हजार ७५ रुग्ण या आजारातून बरे देखील झाले आहेत.

इराणमध्ये दर दहा मिनिटांनी एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू होत असल्यचाी धक्कादायक माहिती इराणच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. तर प्रत्येक तासाला ५० लोकांना करोनाची लागण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये देखील करोनाने थैमान घातले आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत ८३३ मृत्यू झाले असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. तेथील लोकांना घरीच थांबण्याचे सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत.

स्पेनमधील मराठी माणसाचा हे संदेश नक्की ऐका – 

 

करोनाचा धोका ओळखून केंद्र आणि राज्य सरकारने उपाययोजना आखलेल्या आहेत. मात्र जनतेकडून अद्यापही हवा तसा प्रतिसाद लाभलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू लावण्याबाबत सूचना केली आहे. तर मुंबई, ठाण्यात गर्दी कमी झाली नाही तर कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो, असे सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

 

 

First Published on: March 20, 2020 12:52 PM
Exit mobile version