चुकीच्या व्यायामामुळे तरुणाची किडनी झाली फेल

चुकीच्या व्यायामामुळे तरुणाची किडनी झाली फेल

फिट राहण्यासाठी जर तुम्ही डाएटवर असाल जिमलाही जात असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी आहे. कारण नवी दिल्लीतील कालकाजी येथे राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला चुकीचा व्यायाम केल्याने किडनी गमवावी लागली आहे. शिवम असे त्याचे नाव आहे.

बॉडी बनवण्याबरोबरच फिट राहण्यासाठी शिवम नियमित जिमला जातो. पण लवकरात लवकर फिट होण्यासाठी व बॉडी टोनसाठी गेल्या दोन महिन्यापासून तो दररोज २०० दंड बैठका मारत होता. त्याचबरोबर अतिरिक्त व्यायामही तो करत होता. पण याचदरम्यान अचानक त्याच्या पायाला सूज आली. त्यानंतर त्याची लघवीही बंद झाली. यामुळे त्याला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकिय तपासणीत मर्यादेपेक्षा अधिक व्यायाम केल्याने किडनीवर ताण येऊन शिवमला अॅक्यूट किडनी फेल झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एक आठवड्यानंतर शिवमची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय अतिरिक्त व्यायाम करणे, प्रोटीन पावडर घेणे, बॉडीटोनसाठी कृत्रिम हार्मोन , स्टेरॉईड घेणे किंवा पेन किलरचा वापर केल्याने किडनी फेल होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

First Published on: March 12, 2020 5:07 PM
Exit mobile version