टॉप 10 टिवटिव 2019 ! ट्विटरवरील वर्षभरातील ट्वीट, हॅशटॅग, व्यक्ती

टॉप 10 टिवटिव 2019 ! ट्विटरवरील वर्षभरातील ट्वीट, हॅशटॅग, व्यक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदीं

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग म्हणून ओळखले जाते.त्यात ट्विटरसारख्या माध्यमांचा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अगदी असमान्यांपासून सामान्य व्यक्ती ट्विटरवर सक्रीय असतो. ट्विटरवर एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले देखील केले जातात. अशातच ट्विटरने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये वर्षभरात भारतातील ट्विटरवर ट्रेन्ड आणि ट्विटरवर लोकप्रियता मिळालेल्या व्यक्तींची यादी प्रकाशित केली आहे. ट्विटर इंडिया या ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

ट्विटरवर ‘मोदीsss मोदीsss’

2019 या वर्षात ट्विटरवरील सर्वाधिक लोकप्रिय 10 व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ शब्दांचे एक ट्वीट केले होते. त्याला लोकांनी पसंती दर्शवली. ट्विटर इंडियाने पंतप्रधानांचे हे ट्वीट गोल्डन ट्वीट म्हणून घोषित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘सबका साथ+साथ विकास+सबका विश्वास=विजयी भारत।’. त्यापाठोपाठ राहुल गांधी यांनाही पसंती मिळाली आहे. दोन्ही नेत्यांचे अकाउंट्स पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ तिसर्‍या क्रमांकावर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. महिलांमध्ये स्मृती इराणी पहिल्या क्रमांकावर असून दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी- वाड्रा आहेत. तसेच मनोरंजन विश्वात अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांनी आणि अभिनेत्रींमध्ये सोनाक्षी सिन्हाने बाजी मारली आहे.

इलेक्शन हॅशटॅग्सचा धुरळा

भारतात #loksabhaelections2019 हा हॅशटॅग सर्वात जास्त ट्रेन्ड झाला. त्यापाठोपाठ #chandrayaan2 आणि #cwc19 या हॅशटॅग्सनी हे वर्ष गाजवले. हे तिन्ही हॅशटॅग वापरून ट्विपल्सनी अनेक ट्वीट्स केले. यावर्षी अनेक वर्ष सुरू असलेल्या अयोद्धा प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यावेळी #ayodhyaverdict हा हॅशटॅगही ट्रेंन्डमध्ये होता.

मायक्रो ब्लॉगिंग साईटवरील ‘मॅक्रो’ हॅशटॅग्स

इस्त्रोचे चांद्रयान-2, वर्ल्डकप 2019, पुलवामा हल्ला,370 कलम,विजयचा बिगिल चित्रपट,दिवाळी सण,अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम,अयोध्या निकाल,ईद.

=

First Published on: December 11, 2019 5:18 AM
Exit mobile version