300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मिळाला जामीन

300 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मिळाला जामीन

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जामीन मिळाला आहे. स्पेशल पीएमएलए कोर्टाने बुधवारी राणा कपूरला जामीन मंजूर केला आहे. एका प्रकरणात जामीन मिळाला असला तरी राणा कपूर तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाही, कारण सीबीआय आणि ईडीने नोंदवलेल्या इतर गुन्ह्यांमध्ये ते तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

हे प्रकरण Oyster Buildwell Private Limited ने घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे, जी येस बँक लिमिटेड (YBL) च्या Avantha Realty Limited ची होल्डिंग कंपनी आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू कपूर आणि अवंथा ग्रुपचे प्रवर्तक गौतम थापर यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. एजन्सीने बँकेचे 466.51 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आज दिल्ली होयकोर्टाने येस बँकेचे माजी MD आणि CEO राणा कपूर यांच्या जामीन याचिकेवर एनफोर्समेंट डायरेक्टोरेटकडून प्रतिक्रिया मागितली होती. राणा कपूर यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप असून यामुळे येस बँकेला 466.51 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांनी कपूर यांच्या याचिकेवर नोटीस बजावली होती आणि प्रकरण 11 मार्च रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध केले होते.

राणा कपूरने यापूर्वी जानेवारी 2022 मध्येही जामीन याचिका दाखल केली होती, परंतु नंतर त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. त्यांच्यावर आरोप अत्यंत गंभीर असल्याने त्यांना जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.

जानेवारीमध्ये न्यायालयाने अन्य 15 आरोपींचा जामीन मंजूर केला होता. त्या 15 अन्य आरोपींमध्ये बी हरिहरन, अभिषेक एस पांडे, राजेंद्र कुमार मंगल, रघुबीर कुमार शर्मा, अनिल भार्गव, तापसी महाजन. महाजन), सुरेंद्र कुमार खंडेलवाल, सोनू चढ्ढा, हर्ष गुप्ता, रमेश शर्मा, पवन कुमार अग्रवाल, अमित ममतानी यांचा समावेश आहे. आशिष अग्रवाल, अमित कुमार आणि विनोद बाहेती यांचा समावेश आहे.


डॉक्टर पतीने पत्नीवरील उपचारासाठी 70 लाखाला गहाण ठेवली स्वत:ची MBBS डिग्री

First Published on: February 16, 2022 8:28 PM
Exit mobile version