नदीत उडी टाकली अन् तोंडावर पडला, टिक-टॉकवर रेकॉर्ड झाला मृत्यू

नदीत उडी टाकली अन् तोंडावर पडला, टिक-टॉकवर रेकॉर्ड झाला मृत्यू

young man dead while making tik tok video in muzaffarnagar up

टिक-टॉक व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचं फॅड एका तरुणाला चांगलंच महागात पडलय. सोशल मीडियावर टिक-टॉकवर व्हिडिओ करताना अनेकवेळा अपघात झाल्याचे आपण ऐकतो. बऱ्याचदा असे व्हिडिओ तयार करताना युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे घडला आहे. टिक टॉक व्हिडिओच्या नादात एका तरुणाचा बळी गेला आहे. त्याच्या मृत्यूची ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या तरुणानं पाण्यात उडी घेतली आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा तरुण मीरापूर भागातील रहिवासी होता. आपल्या काही मित्रांसोबत तो जवळच्याच कालव्याजवळ गेला होता. पाण्यात उडी मारताना त्याला आपला टिक-टॉक व्हिडिओ बनवायचा होता. त्याने उडी मारण्यापूर्वी त्याचा मित्र त्याला परत येण्यासाठीही बोलावतोय. मात्र त्याने ऐकले नाही. त्याने पाण्यात उडी मारली आणि त्याचा हा अखेरचा व्हिडिओ ठरला.

कुटुंबीयांनी केला मित्रांवर हत्येचा आरोप

पाण्यात उडी घेतल्यानंतर या तरुणाचं डोकं एका मोठ्या दगडावर आपटलं. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा हा धक्कादायक मृत्यू कॅमेऱ्यातही कैद झाला. दरम्यान, तरुणाच्या कुटुंबीयांनी या तरुणाच्या मित्रांवर त्याच्या हत्येचा आरोप केला आहे.

First Published on: March 2, 2020 7:24 PM
Exit mobile version