‘त्याने’ गर्भवती प्रेयसीच्या पोटात लाथ मारली, कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा

‘त्याने’ गर्भवती प्रेयसीच्या पोटात लाथ मारली, कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा

'त्याने' गर्भवती प्रेयसीच्या पोटात लाथ मारली, कोर्टाने दिली 'ही' शिक्षा

सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या एका २४ वर्षीय तरुणाने त्याच्या गर्भवती प्रेयसीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी सिंगापूरच्या जिल्हा न्यायालयाने दहा आठवड्यांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ‘द न्यू पेपर’ने यासंदर्भात माहिती दिली आहे. हिंसा आणि आपल्या रागावर संयम न ठेऊ शकल्यामुळे न्यायाधीश मैथ्यू जोसेफ यांनी या तरुणाला चांगलेच फटकारले आहे. या तरुणाचे नाव मोहम्मद मुस्तफा अली असे आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

११ जून २०१७ रोजी मुस्तफाचे आपल्या प्रेयसीसोबत भांडण झाले होते. मुस्तफाची प्रेयसी गर्भवती आहे. ती मुस्तफाच्या मुलाची आई बनणार होती. तरीदेखील मुस्तफाने त्याच्या प्रेयसीला मारहाण केली. यासोबतच तिच्या पोटावर लाथही मारली. त्यामुळे प्रेयसी ताबोडतोब जवळच्या रुग्णालयात गेली. या प्रेयसीने पोलिसांत धाव घेत मुस्तफाच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयात मुस्तफाच्या विरोधात खटला सुरु झाला. बुधवारी मुस्तफाच्या विरोधात सर्व आरोप सत्य ठरले आणि तो आरोपी ठरला. त्यानंतर न्यायाधीशांनी मुस्तफाला चांगलेच फटकारले आणि त्याला क्रोधावर नियंत्रण न मिळवणे आणि गर्भवती महिलेला जखम पोहोचवल्याप्रकरणी आठ आठवड्यांची पोलीस कोठडी सुनावली.

First Published on: March 28, 2019 4:08 PM
Exit mobile version