नशीब बलवत्तर; जगनमोहन रेड्डी बाल बाल बचावले

नशीब बलवत्तर; जगनमोहन रेड्डी बाल बाल बचावले

जगनमोहन रेड्डी यांच्यावर जीवघेणा हल्ला ( फोटो सौजन्य - इंडियन एक्सप्रेस )

आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये जगनमोहन रेड्डी बालबाल बचावले आहेत. वायझॅक विमानतळावर जगनमोहन रेड्डी यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर विमानतळावर धारधार शस्त्र घेऊन जाताच कसे आले? असा सवाल उपस्थि केला जात आहे. जरीपाली श्रीनिवास असं या हल्ला करणाऱ्या तरूणाचं नाव आहे. दरम्यान, या हल्ल्यामध्ये रेड्डी यांच्या खांद्याला जखम झाली आहे. हल्ल्यानंतर लगेगच पोलिसांनी जरीपाली श्रीनिवास या हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. विमानतळावर चहा, नाश्ता झालयानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बेसावध असलेल्या जगनमोहन यांच्यावर हा हल्ला झाला आहे. सध्या जगनमोहन रेड्डी हे आंध्रप्रदेशात पदयात्रा करत आहेत.

नशीब बलवत्तर म्हणून…

जगनमोहन रेड्डींनी आंध्रप्रदेशात पदयात्रा काढली आहे. त्याचदरम्यान वायझॅक जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी विमानतळाच्या कॅन्टीनमध्ये चहा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांच्यावर त्याच कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या जरीपाली श्रीनिवास या तरूणानं हल्ला केला. सुदैवानं हा वार खाद्यावर झाला. दरम्यान कार्यकर्ते देखील सावध झाले आणि त्यांनी रेड्डी यांना देखील सावध केले. दरम्यान कंत्राटदाराला कॅन्टीन चालवण्याचं काम हे टीडीपी नेत्यानं केलेल्या शिफारशीवरून मिळाल्याचं रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. परिणामी या हल्ल्यामागे कुणाचा हात आहे याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून करावी अशी मागणी आता YSR काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. पोलिस सध्या हल्लेखोर तरूणाची कसून चौकशी करत आहेत. या हल्ल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीं यांनी देखील या हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे.

First Published on: October 25, 2018 2:31 PM
Exit mobile version