तरुणाईमधला दिवाळी फॅशन सेन्स

तरुणाईमधला दिवाळी फॅशन सेन्स

चला आता बघूया दिवाळीच्या पहिल्या दिवशी पारंपरिक कपड्यांमध्ये मुलांसाठी काय पर्याय आहेत.जेणेकरून मुली नक्कीच इम्प्रेस होतील.

१- कुर्ता-धोतर:
हा पर्याय सगळ्याचे सोपा आहे,कारण ह्याच शॉपिंग करायला खूप ठिकाणी फिरावं अजिबात लागत नाही.अगदी ऑनलाईन सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता.आणि हल्ली धोतर मागणी नुसार शिवून मिळत.मुलांसाठी कपड्यांमध्ये जास्त ऑप्शन नसतात हे जरी खरं असल तरी या बाबतीत मात्र मुलांसाठी बाजारात आणि ऑनलाईन बाजारात सुद्धा कुर्त्याचे खूप ऑप्शन उपलब्ध आहेत.

प्रिंटेड,प्लेन, असे कुर्ते उपलब्ध असतात.आणि ह्यात सुद्धा भगवा,पांढरा,पिवळा या रंगाचे कुर्ते सध्या फॅशन मध्ये in आहेत.

आणि धोतर तर पांढरा रंग आहे,किंवा अगदी पर्पल रंगामध्ये सुद्धा उपलब्ध आहे .हे धोतर शिवलेला असल्यामुळे सुटायचं टेन्शन नाही.आणि ज्यांची पर्सनॅलिटी चांगली आहे त्यांना तर अजूनच भारी दिसत.

२-कुर्ता-पायजमा/जीन्स आणि जॅकेट :
हा सर्व तरुणांचा आवडता पर्याय आहे.कारण यात तरुण पारंपरिक दिसतोच त्याचसोबत स्टयलिश पण दिसतो.कारण तुम्हाला अगदीच पारंपरिक घालायचं नसेल तर.हा ऑप्शन जीन्स वर सुद्धा तेवढाच रापचिक दिसतो.

हल्ली तर जॅकेटचे खूप ऑप्शन आहेत.अगदी खादीपासून वेलवेट पर्यंत उपलब्ध आहेत.आणि जॅकेटच्या फायदा हा आहे की फॉर्मल प्लेन शर्टवर सुद्धा घालता येत.त्यामुळे जॅकेट फक्त पारंपरीक न राहता कॅज्युअल स्टाईल मध्ये पण घालता येत .

३-पारंपरिक accessories
हा मुद्दा सगळ्यात शेवटचा असला तरी तेवढाच महत्वाचा आहे.कारण accessories मुळेच आपण जे कपडे घालतो ते अजून चांगले दिसतात.धोतर असुदे किंवा जीन्स पायात कोल्हापुरी घातली की एक रांगडा लूक येतोच.

हातात कड घाला पण अजून जास्त ओव्हरडोस होऊ देऊ नका.accessories चा ओव्हरडोस झाला की आपलं इम्प्रेशन डाऊन झालंच म्हणून समजा.

First Published on: November 4, 2018 5:58 AM
Exit mobile version