बालगोपाळांनी साकारली पन्हाळा गडाची प्रतिकृती

रांगोळी, कंदील, फटाके, फराळ अशा सर्व गोष्टींप्रमाणेच दिवाळीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे किल्ले. महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचे मोठा वैभवशाली इतिहास लाभला आहे. आपल्या परक्रमी मावळ्यांच्या आणि महाराज्यांच्या पराक्रमाचे, शौर्याचे, आनंदाचे साक्षीदार म्हणून या किल्ल्यांकडे पाहिले जाते. हे गडकिल्ले सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र दिवाळीनिमित्त आपल्या गडकिल्ल्यांचा इतिहास जपण्याचा प्रयत्न मुंबईसारख्या शहरातही केला जातोय. दहिसरमधील पंचवटी धाम सोसायटीच्या माध्यमातूनही यंदा दिवाळीनिमित्त पन्हाळा गडाची प्रतिकृती साकारून महाराजांचा इतिहास जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. चला तर मग पाहू कशी साकारली आहे त्यांनी पन्हाळा गडाची प्रतिकृती….

First Published on: November 5, 2021 5:11 PM
Exit mobile version