अमित शहा यांच्यावर कोविड निवारणाची विशेष जबाबदारी

अमित शहा यांच्यावर कोविड निवारणाची विशेष जबाबदारी

गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राजकीय बैठका, सभांपासून दूर आहेत. कोरोनाची लागण, कोरोनावर मात केल्यानंतर निर्माण झालेल्या समस्या यांच्यामुळे अमित शहा बिहार विधानसभा निवडणुकीपासूनही दूरच होते. मात्र, आता अमित शहा सक्रिय झाले आहेत. त्यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली असून त्यासाठी त्यांनी रविवारी अतिशय महत्त्वाची बैठक बोलावली होती.

दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. दररोज कोरोनाचे सात हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढली आहे. या परिस्थितीची गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहांनी आज नवी दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील.
दिल्लीत काल दिवसभरात ४९ हजार ६४५ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. राजधानीत कोरोना संक्रमणाचा दर १४.७८ टक्केे इतका आहे. काल दिल्लीत ९६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ७ हजार ५१९ वर पोहोचली. दिल्लीत सध्याच्या घडीला ४४ हजार ४५६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ८२ हजार १७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बर्‍या झालेल्यांचं प्रमाण ८९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

First Published on: November 16, 2020 12:19 AM
Exit mobile version