Diwali 2020 : लक्ष्मी-पूजनाच्या वेळी ‘या’ तीन गोष्टी ठेवा लक्षात

Diwali 2020 : लक्ष्मी-पूजनाच्या वेळी ‘या’ तीन गोष्टी ठेवा लक्षात

Diwali 2021 : दिवाळीत लक्ष्मीच्या स्वागतासाठी करा 'या' गोष्टी

हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. दिपावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीला दिव्यांचा सण म्हणूनही ओळखले जाते. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक, अज्ञानावर ज्ञान, वाईटावर चांगले आणि निराशेवर आशा देणारा सण म्हणजे दिपावली. यामध्ये प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो. लक्ष्मी-पूजनाच्या वेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. जाणून घेऊया अशा काही महत्त्वाच्या गोष्टी.

कोणत्या दिशेने पूजा करावी

सर्वप्रथम देवघर स्वच्छ करावे. विशेष म्हणजे देवघराच्या भिंती फिकट पिवळ्या, गुलाबी किंवा हिरव्या रंगाच्या असणे जास्त योग्य आहे कारण हे रंग सकारात्मक ऊर्जेची पातळी वाढवतात. काळे, निळे आणि तिपकिरी सारख्या तामसिक रंगांचा वापर देवघराकरता करु नये.

उत्तर पूर्व दिशेकडे पूजेचे साहित्य ठेवावे

पूजा करताना तोंड उत्तरेकडे किंवा पूर्व दिशेकडे असावे. उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे म्हणून हे स्थळ यक्ष साधना (कुबेर), लक्ष्मी-पूजन आणि गणेश पूजनासाठी आदर्श स्थळ आहे.

धनाची देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो

देवी लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे. लाल रंग हे वास्तू मध्ये देखील सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जाते, म्हणून देवी आईला अर्पण केले जाणारे कपडे, शृंगाराच्या वस्तू आणि फुले शक्यतो लाल रंगाचे असावे. देवघराच्या दारावर शेंदूर किंवा कुंकुाने स्वस्तिक बनविल्याने नकारात्मक शक्ती घरात येत नाही.


हेही वाचा – Diwali 2020: ‘या’ दिवशी साजरी होणार दिपावली; जाणून घ्या, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त


 

First Published on: November 14, 2020 6:30 AM
Exit mobile version