तुळशी विवाहामागची पौरार्णिक कथा

तुळशी विवाहामागची पौरार्णिक कथा

तुळशी विवाहामागची पौरार्णिक कथा

दिवाळी संपल्यावर आपण आतुरतेने वाट बघतो ती म्हणजे तुळशीच्या लग्नाची. तुळशीचं लग्न झाले की इतर लग्न व्हायला सुरूवात होते. दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह संपन्न केला जातो. घराच्या अंगणात तुळशीचा विवाह केला जातो. पण तुळशीचा विवाह करतात म्हणजे नक्की काय करतात हा प्रश्न नेहमी पडतो. तुळशीचे लग्न का लावले जाते आणि मुख्य म्हणजे कोणासोबत लावले जाते? जाणून घेऊया तुळशी विवाह करण्यामागची पौरर्णिक कथा.

जालंदर नावाचा एक राक्षस होता. त्याने आपल्या पराक्रमाने वैभव प्राप्त केले होते. तो देव, देवता, ऋृषीमनुनी त्रास देत होता. त्याच्या त्रासाला देवलोक त्रासले होते. पण जालिंदरचा पराभव करणे देवांना जमत नव्हते. कारण जालिंदरची पत्नी वृंदा ही खूप पुण्यवान होती. तिच्या पुण्याईमुळे जालिंदरला वैभव प्राप्त झाले होते. जालिंदरला हरवण्याचे विष्णूने ठरवले . एकदा जालिंदर नसताना भगवान विष्णू जालिंदरचे रूप घेऊन वृंदाचे सत्व हरण केले. त्यामुळे तिची पवित्रता नष्ट झाली आणि जालिंदरचा पराभव झाला. त्यानंतर वृंदाने देहत्याग केला. भगवान विष्णू वृंदेच्या पतिव्रतेमुळे संतुष्ट होऊन तिला तुळशीचे रोप होण्याचा वर दिला. त्यानंतर वृंदाहीच तुळशीच्या रूपाने प्रकट झाली. वृंदेचे महत्त्व वाढावे म्हणून भगवान विष्णूंनी तुळशीसोबत लग्न केले. त्यादिवशीपासून आपल्याकडे तुळशी विवाह करण्याची परंपरा सुरू झाली.

असे म्हटले जाते की, भगवान श्री विष्णू आषाढ शुद्ध एकादशीला शयन करतात आणि ते कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात. तुळशी विवाह करणाऱ्याला कन्यादानाचे फळ मिळते असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे हे व्रत तुळशी वनात करणे हे पुण्याचे समजले जाते.

तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या झाडाला फुलांनी सजवले जाते. तुळशीच्या मुळाशी चिंचा, बोरे, आवळे ठेवली जातात. लग्नाच्या मांडवासाठी उसाचा वापर केला जातो. वृदांवनाच्या भोवताली ऊस रचून मांडव बांधला जातो. तुळशीत बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. एकीकडे बाळकृष्ण आणि एकीकडे तुळस उभी करून मध्ये अंतरपाट धरण्यात येतो. सगळ्यांना अक्षता वाटल्या जातात. साग्रसंगित मंगलाष्टके म्हणून तुळशीचा विवाह लावला जातो. तुळशीचे कन्यादान केले जाते. आपल्या घरातील मुलीला श्रीकृष्णासारखा नवरा मिळावा हा या मागचा हेतू आहे. विवाह झाल्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून चिंचा,बोरे,ऊस कुरमुरे वाटले जातात.


हेही वाचा – वयाच्या ६०व्या वर्षी ‘या’ मराठी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ

 

First Published on: November 26, 2020 4:28 PM
Exit mobile version