तेजस लोखंडे यांच्या बाप्पाला ‘कॅनव्हास पेंटिंगचा’ साज

तेजस लोखंडे यांच्या बाप्पाला ‘कॅनव्हास पेंटिंगचा’ साज

इको फ्रेंडली बाप्पा

डॉ. तेजस लोखंडे यांनी आपल्या बाप्पाला ‘कॅनव्हास पेंटिंगचा’ साज चढवला आहे. चर्नी रोड येथे वास्तव्यास असलेले डॉ. तेजस लोखंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही इको फ्रेंडली देखावा साकारला आहे. यांच्या घरी गौरी गणपतीपर्यंत बाप्पा असतो. तसेच दरवर्षी हे कुटुंबिय इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतात.

यंदा लोखंडे कुटुंबियांनी बाप्पाच्या देखाव्या करता स्वत:च्या हाताने तयार केलेले कॅनव्हास पेंटिंग देखाव्यात वापरले आहे. देवदार लाकडांची फ्रेम, कॅनव्हास कपडा आणि रंग या साहित्यापासून हा देखावा साकारण्यात आला असून त्यांची मूर्ती देखील शाडूची आहे.

कलाकार हा साधक असतो तर कला साध्य असते. कलाकार कलेचे पदर उलगडत नेतो आणि कला सादर होते. कला आस बनते, ध्यास बनते, श्वास बनते. ईश्वरा, जन्म देताना झोळीत ओंजळभर कला टाकलीस. त्या कलेवर आम्ही मनापासून प्रेम केलं. तिचा ध्यास धरला, अभ्यास केला. कला हाच जीवनाचा श्वास झाला. तुझ्या चरणी ती साकार करताना तुझी उपस्थिती असावी. तू १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती, स्वतः नृत्य करत सकल कलाकारांना कला जपा हा संदेश देतो आहेस. असा श्रींचा संदेश हा आदेश मानून कलानिवेशाचा हा अल्पसा प्रयत्न असल्याचे डॉ. तेजस लोखंडे यांनी सांगितले आहे.

पत्ता – १८/अ, सिंघानिया बिल्डिंग, तिसरा मजला, केनेडी ब्रीज, ऑपेरा हाऊस, चर्नी रोड, मुंबई – ४

संपर्क क्रमांक – ९७७३२६७००१

First Published on: September 6, 2019 10:48 AM
Exit mobile version