३ हजार ३०० पेन्सिलपासून केली बाप्पाची आरास

३ हजार ३००  पेन्सिलपासून  केली बाप्पाची आरास

गिरीश मोकल यांनी आपल्या बाप्पाकरता पेन्सिलपासून आरास केली आहे. मोकल कुटुंबियांने तब्बल ३ हजार ३०० पेन्सिलपासून देखावा साकरला आहे. रायगड येथे वास्तव्यास असलेल्या विजय वैघ यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही इको फ्रेंडली देखावा साकारला आहे.

यंदा मोकल कुटुंबियांनी बाप्पाच्या देखाव्या करता पेन्सिलचा वापर केला असून गेले ३ वर्षे हे कुटुंब इको फ्रेंडली बाप्पा साकारत आहे. तसेच त्यांच्या घरी दीड दिवसाचा बाप्पा असतो. वाढत्या प्रदूषणामुळे दिवसें दिवस निसर्गाच्या साधन संपत्तीची हानी होत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आमचा थोडासा हातभार लागावा म्हणून इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करावा असे वाटले. आता खूप सारे जण इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करतात पण आम्ही एक पाऊल पुढे जाऊन गणपतीची आरास परत कशी वापरता येईल याचा विचार करून करत असतो. त्याप्रमाणे मागील काही वर्ष आम्ही गणपतीची आरास परत उपयोगात येईल, असे साहित्य वापरून बनवत आहोत. यावर्षी आम्ही पेन्सिल पासून आरास बनवली आहे. तसेच त्या पेन्सिल नंतर आम्ही गरजू आणि आदिवासीतील विद्यार्थ्यांना देणार आहे.

पत्ता : मुक्तांगण छत्रपती शिवाजी रोड, रोहिदास नगर महाड रायगड 402301

संपर्क क्रमांक : ९४२२४९५८२६, ९४०३५०७२२८

First Published on: September 8, 2019 6:28 PM
Exit mobile version