गड किल्ल्यांची माहिती देणारा मिलिंद देऊलकर यांचा बाप्पा

गड किल्ल्यांची माहिती देणारा मिलिंद देऊलकर यांचा बाप्पा

विरारमध्ये राहणारे मिलिंद देऊलकर मागच्या ११ वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत. “आपण माणूस म्हणून जन्मला आलो आहोत. इतर सजिवांचा देखील विचार करण्याची क्षमता मनुष्याला आहे. याच कारणावरून निसर्गाचा होत असणारा ऱ्हास पाहता सागरात आणि तलावात गाळ बनून पाण्याचे प्रवाह नष्ट करणारे प्लास्टर ऑफ पॅरीसची मूर्ती आम्ही बंद केल्या आहेत. काही क्षणात मातीत मिसळणारी आणि पाण्यातील जिवांना कोणतेही नुकसान होणार नाही, अशी मूर्ती आणून पूजा केली जाते.” अशी माहिती देऊलकर यांनी दिली.

गड किल्ले म्हणजे स्वराज्यचे संवर्धन झालेच पाहिजे नाहीतर पुढील पिढीला गड किल्ले काय हे चित्रात दाखवावे लागेल, यासाठी देऊलकर यांनी गड किल्ल्यांची माहिती देणारा देखावा निर्माण केला आहे. “महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले त्यात अनेक गड किल्ले बांधले काही जिंकले आज महाराष्ट्रात ४६१ गड किल्ले आहेत. हजारो मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देवून हे स्वराज्य उभे केले. पण आज शेकडो वर्षांनी याच गड किल्यांची पडझड झाली आहे. त्याकडे दुर्लक्ष होवून ते नामशेष होत आहेत. यासाठी सर्वांना या इतिहासाची पुन्हा जाणीव करून देण्यासाठी देऊलकर परिवार गणपतीच्या या सणानिमित्त “गड किल्ले वाचवा, त्यांचे संवर्धन” करा हा संदेश देणारा देखावा घरी साकारला आहे.

MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा



स्पर्धकाचे नाव – मिलिंद देऊलकर

पत्ता – गुलमोहर कॉम्प्लेक्स, विरार पश्चिम

First Published on: September 9, 2019 2:19 PM
Exit mobile version