पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उमेश शिंदे यांचा बाप्पा

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उमेश शिंदे यांचा बाप्पा

बदलत्या हवामानाचे परिणाम हळूहळू जगाला जाणवू लागले आहेत. भविष्यात याचे गंभीर परिणाम मानवजातीला भेडसावू लागतील. फक्त मनुष्य जीवांवरच नाही तर पशू-पक्षी सगळ्यांनाच याचे परिणाम भोगावे लागतील, याची जाणीव सगळ्यांना होऊ लागली. तरी देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून फक्त स्वार्थ साधला जात आहे. परंतु पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून विकास होत नसून आपण अधोगतीकडे चाललो आहेत, हे लक्षात येणे फार गरजेचे आहे. म्हणून नाशिकमधील उमेश शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेताल.

विद्या सहयोग सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पर्यावरण संवर्धन जनजागृती करण्यात येते. प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी हा देखावा पुर्णतः पर्यावरण पूरक, शाडूची मुर्ती, वडाचे झाड, हिरव्यागार झाडांची रोपे आदी पासून तयार केला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.


 

स्पर्धकाचे नाव – उमेश मोतीराम शिंदे

पत्ता – विद्या सहयोग सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटीच्या (महा रजि)
मु पो.आडगाव,मंजुळा निवास, ता.
जि. नाशिक -४२२००३

First Published on: September 9, 2019 6:29 PM
Exit mobile version