वैष्णवी कुलकर्णीने साकारला शेत शिवारातील ‘गणेश’

वैष्णवी कुलकर्णीने साकारला शेत शिवारातील ‘गणेश’

वैष्णवी कुलकर्णीने साकारला इको फ्रेंडली बाप्पा

वैष्णवी कुलकर्णी यांनी आपल्या बाप्पाकरता इको फ्रेंडली देखावा साकारला आहे. नाशिक येथे राहणाऱ्या कुलकर्णी कुटुंबियांकडे गेले १२ वर्ष गणेशोत्सव साजरा केला जातो. तसेच ते दरवर्षी इको फ्रेंडली बाप्पा साकारतात. यंदा देखील त्यांनी इको फ्रेंडली देखावा साकारला असून यंदा त्यांनी गावचा देखावा साकारला आहे.

सजावट- पर्यावरण पूरक शेत शिवारातील गणेश साकारण्यासाठी काळी माती, आईसक्रीमच्या चप्पट काड्या, पुठ्याचा वापर करून झोपडी आणि विहीर, आईसक्रीमच्या चप्पटकाड्या वापरून कुंपण आणि बैलगाडी तयार केली आहे. तसेच पेपरच्या झिरमिळ्या, तसेच विहिरीत डोकावले तर ती पाण्याने भरलेली वाटावी म्हणून त्यात गोल आरसा ठेवला आहे. त्याचप्रमाणे एलिडी समया लायटींगईचा वापर केला आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस या मूर्ती बरेच वर्ष पाण्यात विघटन होत नाहीत, त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. यामुळे गायशोत्सवासोबत पर्यावरण आपण जपले पाहिजे ही जाणीव दृढ होत गेली आणि पहिल्या वर्षांपासून फक्त पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करू लागलो, अशी प्रतिक्रिया कुलकर्णी कुटुंबियाने दिली आहे.

First Published on: September 10, 2019 3:39 PM
Exit mobile version