शिक्षणाचे महत्त्व सांगणारा विशाल सारंग यांचा बाप्पा

शिक्षणाचे महत्त्व सांगणारा विशाल सारंग यांचा बाप्पा

कांजूर मार्ग येथे राहणारे विशाल चंद्रकांत सारंग यांनी चलचित्राच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. मागच्या ५५ वर्षांपासून ते इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले. सारंग यांच्या घरी ११ दिवसांसाठी बाप्पा विराजमान असतो. पर्यावरणाचे रक्षण व्हावे, आपल्या कृतीमुळे पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, या भावनेतून त्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव सुरु केला.

सारंग यांनी चलचित्राद्वारे चाणक्य, आर्यभट्ट यांच्यापासून महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले ते अब्दुल कलाम यांच्यापर्यंत शिक्षणाचा आदर्श घालून देणाऱ्या महापुरुषांचे विचार मांडले आहेत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आणि विश्वास नांगरे पाटील यांच्याही प्रतिमा त्यांनी दाखविल्या आहेत. तसेच स्पर्धा परिक्षेबाबत प्रबोधन करण्यासाठी त्यांचाही उल्लेख सजावटीत करण्यात आला आहे.

स्पर्धकाचे नाव – विशाल चंद्रकांत सारंग

पत्ता – फिलिप्स क्रीडा चाळ, रूम क्रमांक -२,योगेश मेडिकल चा शेजारी, पोलीस चौकी जवळ ,कांजूर मार्ग पूर्व

First Published on: September 6, 2019 8:38 PM
Exit mobile version