दिलीप सावंत यांच्याकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव

दिलीप सावंत यांच्याकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव

गणेशोत्सवाची मूर्ती असो की सजावटीचे साहित्य. प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल सारख्या वस्तूंच्या वापरामुळे प्रदूषण वाढू लागल्याने गेल्या काही वर्षांपासून वरळी येथे राहणारे दिलीप सावंत आणि कुटुंबिय पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करत आहेत. यावर्षीसुद्धा त्यांच्या घरी शाडूमातीपासून बनविण्यात आलेल्या गणरायाचे आगमन झाले आहे. लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती म्हणजे वायंगणकर परिवाराचा राजा अशी ओळख निर्माण झाल्याचे दिलीप सावंत यांनी सांगितले. थर्माकोलच्या बंदिमुळे कापडापासून इको फ्रेंडली मखर तयार केले. पूर्ण मखर असून घरातील सर्व भिंती रंगीबेरंगी कापडांनी सजवण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण घरामध्ये कापडी छत लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे छताला सुंदर झालर लावली आहे. अशाप्रकारे सावंत कुटुंबियांनी पर्यावरणपूरक सजावट केली आहे. अनंत चतुर्दशी दिवशी दिलीप सावंत आणि कुटुंबिय गणरायाला निरोप देतात.


स्पर्धकाचे नाव – दिलीप सावंत 
पत्ता – रूम न. ६१, आंनद नगर कांबळे वसाहत, डॉ. ई. मोझेस रोड , वरली मुंबई .१८


First Published on: September 6, 2019 8:45 PM
Exit mobile version