भाग्यश्री कलंत्री यांचा इको फ्रेंडली बाप्पा

भाग्यश्री कलंत्री यांचा इको फ्रेंडली बाप्पा

भाग्यश्री शशिकांत कलंत्री

अहमदनगरच्या नेवासामधील भाग्यश्री कलंत्री यांच्या घरीदेखील इको फ्रेंडली बाप्पाचे आगमन होते. त्याविषयी सागंताना, गणपतीची ११ दिवस आम्ही पुजा करतो. इको फ्रेंडली बाप्पामुळे प्रदूषण होत नाही. आम्ही ६ वर्षापासून गणपती बसवतो. मी पूर्ण २१ दुर्वांची जुडी करून आजूबाजूला लावली आणि सर्व बाजूने टेबलला साडी लावली असून कलश, फळ, बालकृष्ण, बैल, पुजेचे साहित्य ठेवून सजावट केली आहे. इको फ्रेंडली बाप्पामुळे एक प्रेरणा मिळते. त्याने कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. गणेशाच्या आगमनामुळे आणि वास्तव्यामुळे घरात आनंदीमय, उत्साहपूर्वक वातावरण तयार होते. रोज आरती, भजन गाऊन गणपतीची मनोभावे सेवा केली जाते.बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. खुप शक्तीशाली देव म्हणून त्याकडे पाहिले जाते.


हे वाचा –  इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती


भाग्यश्री शशिकांत कलंत्री

स्पर्धकाचे नाव : भाग्यश्री शशिकांत कलंत्री
पत्ता : घोडेगाव तालुका, नेवासा , जिल्हा – अहमदनगर


First Published on: September 7, 2019 3:45 PM
Exit mobile version