जगन घाणेकर यांच्या घरातील ‘इको फ्रेंडली बाप्पा’!

जगन घाणेकर यांच्या घरातील ‘इको फ्रेंडली बाप्पा’!

ज्या निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश गणपती बाप्पा आपल्याला देतो. त्या निसर्गाला हानिकारक अशा गोष्टींचा वापर त्याच्या सजावटीसाठी केल्यास त्याला ते नक्कीच आवडणार नाही. यासाठी पहिल्या वर्षांपासून आम्ही पर्यावरणपूरक सजावट करण्याचे ठरवले होते. त्यानुसार थर्माकोलवर बंदी येण्याच्या अगोदरही आम्ही सजावटीसाठी कधी थर्माकोलचा वापर केला नाही, असे घाटकोपर येथे राहणारे जगन घाणेकर सांगतात. त्यांच्या घरीदेखील इको फ्रेंडली बाप्पा विराजमान झाले असून सात दिवस गणरायाचे वास्तव्य घाणेकर कुटुंबात असणार आहे. बाप्पासाठी वापरण्यात आलेल्या मखराच्या सजावटीसाठी कागद आणि कापडाचा वापर करण्यात आला आहे. गेल्या ११ वर्षांपासून घाणेकर कुटुंब बाप्पाची प्रतिष्ठापना करत आहेत.


हे वाचा –  इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती


स्पर्धकाचे नाव : जगन घाणेकर
पत्ता : खोली क्र. १, मोरे चाळीजवळ, अल्ताफ नगर, गोळीबार रोड, घाटकोपर (पश्चिम), मुंबई – ४०००८६


First Published on: September 2, 2019 9:42 PM
Exit mobile version