मच्छिंद्र म्हात्रे यांनी बाप्पासाठी पेंढ्यापासून केली गुफा!

मच्छिंद्र म्हात्रे यांनी बाप्पासाठी पेंढ्यापासून केली गुफा!

मच्छिंद्र म्हात्रे

पनवलेच्या मच्छिंद्र म्हात्रे यांच्या घरी दरवर्षी बाप्पा पाच दिवसांसाठी विराजमान होतो. दरवर्षी ते थर्माकोलचे मखर बाप्पाच्या सजावटीसाठी वापरतात पण गेले दोन वर्ष थर्माकोल बंदी झाल्यापासून ते पर्यावरण पूरक मखर बाप्पासाठी वापरतात. त्यामुळे या वर्षी त्यांचा बाप्पा हा इको फ्रेंडली झाला आहे. या आधी बाजारातून बाप्पासाठी मखर आणले जायचे पण आता मच्छिंद्र म्हात्रे स्वत: बाप्पासाठी मखर तयार करतात. त्यामुळे बाप्पाचे सौंदर्य आणखीनच खुलून आले आहे.


हे वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती 


 

मच्छिंद्र म्हात्रे

या वर्षी खास बाप्पासाठी गुफा तयार करण्यात आली होती. वृत्तपत्राची रद्दी आणि पेंढ्यापासून ही गुफा तयार करण्यात आली होती. तसेच पांढऱ्या पेपरांचा वापर करून धबधबाही तयार करण्यात आला.
बाप्पा ला आवडेल असे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा झाला आहे. सरकारने घेतलेला प्लास्टिक बंद चा नियम यामुळे आणखीन जोश आला असे मच्छिंद्र म्हात्रे अवर्जून सांगतात.


स्पर्धकाचे नाव– मच्छिंद्र म्हात्रे

पत्ता -मु.रोहिंजन नवीन वसाहत पो.तळोजा, ता.पनवेल,जी.रायगड.

First Published on: September 10, 2019 2:01 PM
Exit mobile version