प्रकाश जाधवांच्या बाप्पाच ‘कागदी पिशव्यां’साठी आवाहन

प्रकाश जाधवांच्या बाप्पाच ‘कागदी पिशव्यां’साठी आवाहन

बाप्पाच कागदी पिशव्यांसाठी आवाहन

डोंबिवलीच्या प्रकाश जाधव यांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यांच्या घरी पाच दिवसाचा गणपती असतो. दरवर्षी हे कुटुंब पर्यावरण जागरुकता, सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करतात. यंदा ही या कुटुंबाने एक आगळा वेगळा संदेश देणारा देखावा तयार केला आहे. या देखाव्यात ‘बाप्पा’ने प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कागदी पिशवीचा वापर करण्याचा संदेश खुद्द गणपती बाप्पा जनतेस आणि उंदीर मामाला देत आहेत. या स्वरुपाचा देखावा जाधव कुटुंबाने तयार केला आहे.

जाधव यांच्या घरी शाडूची मूर्ती आहे. देखाव्यासाठी साहित्य म्हणून पेपर,सुतळ,वॉटर कलर असे विघटनशील साहित्यांचा वापर केला आहे.

प्रकाश जाधव यांने सांगितले की, आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येकास प्रसाद देताना आम्ही स्वत: घरी बनविलेल्या वृत्तपत्रांच्या पिशव्या या देत आहोत जेणेकरुन बाप्पांचा हा संदेश देखावारुपी न राहता गणेशभक्तांच्या मनापर्यंत पोहोचावा.

First Published on: September 14, 2018 10:00 PM
Exit mobile version