जलतांडवाची दाहकता दाखवणारा रेखा मालपुरे यांचा बाप्पा

जलतांडवाची दाहकता दाखवणारा रेखा मालपुरे यांचा बाप्पा

रेखा मालपुरे यांचा बाप्पा

कल्याणच्या रेखा मालपुरे यांच्या बाप्पाचे हे २९ वे वर्ष आहे. गेले २८ वर्ष ते इको फ्रेंडली बाप्पा बसवण्यावर भर देतात. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने शाडूची मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. दरवर्षीच रेखा मालपुरे आपल्या देखाव्यातून एखादा संदेश देतात.

रेखा मालपुरे यांच्या बाप्पाचा देखावा

हे वाचा इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती


रेखा यांनी आपल्या देखाव्यातून सांगली- कोल्हापूरल,गुजरातला आलेल्या जलतांडवाचे रूप उभारले आहे. यावेळी एनडीआरफच्या जवानांनी लोकांना कशाप्रकारे वाचवले याचा देखावा उभारला आहे. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे, जागोजागी पडलेल्या प्लॅस्टिकमुळे पाणी अडून राहते. त्यामुळे सगळ्यांनीच प्लॅस्टिकचा वापर टाळा असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जलतांडवाच्या वेळी वृत्तपत्रातून आलेल्या बातम्यांचे फोटो त्यांनी या सजावटीसाठी वापरले आहेत.

रेखा मालपुरे यांच्या बाप्पाचा देखावा

रेखांजीच्या गणपतीचे विसर्जन घरीच त्यांच्या बागेत केले जाते. विसर्जन केल्यानंतर त्याचे पाणीही बागेतील झाडांना दिले जाते. विशेष म्हणजे मूर्तीच्या विसर्जना नंतरची मातीही पुन्हा मूर्तीकारास दिली जाते.

स्पर्धकाचे नाव : रेखा मालपुरे
पत्ता : बी १२-अ, सालस सोसायटी,रामबाग कल्याण (पश्चिम)४२१३०१ 


First Published on: September 2, 2019 2:08 PM
Exit mobile version