म्हाडगुत कुटुंबियांनी यंदा केली इको फ्रेंडली सजावट

म्हाडगुत कुटुंबियांनी यंदा केली इको फ्रेंडली सजावट

म्हाडगुत कुटुंबियांच्या बाप्पाला इको फ्रेंडली सजावट

परळ येथील रहिवासी शार्दुल म्हाडगुत यांच्या घरी १९५१ सालापासून बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते . परळ येथील वाकाणी हाऊस इमारतीत १०* १६ चौरस फुटाच्या खोलीतून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यामुळे ६७ वर्षांची परंपरा या उत्सवाला आहे. आजही एकत्र कुटुंब पद्धतीने हा गणेशोत्सव त्यांच्याकडे साजरा केला जातो. त्यांच्याकडे ७ दिवस बाप्पा असतो. विशेष म्हणजे त्यांची मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवली जाते. यंदा त्यांनी पहिल्यांदाच इको फ्रेंडली सजावट केली आहे. त्यांनी गुरुकुल पद्धतीवर हा देखावा उभारला असून यासाठी कागदाचा लगदा, लाकूड, गवत याचा वापर केला आहे. पर्यावरणाचा वाढता ऱ्हास पाहता पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी यंदा इको फ्रेंडली सजावट केली आहे.

First Published on: September 15, 2018 3:46 PM
Exit mobile version