रश्मी घुले यांचा पर्यावरणपूरक बाप्पा

रश्मी घुले यांचा पर्यावरणपूरक बाप्पा

रश्मी घुले यांचा पर्यावरणपूरक बाप्पा

कल्याण येथील रश्मी विजय घुले यांच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा असतो. त्यांनी इको फ्रेंडलीची कास धरत गणेशोत्सव साजरा केला आहे. यंदा त्यांनी बाप्पाच्या सजावटीसाठी पर्ण कुटी तयार केली आहे. ही कुटी इको-फ्रेंडली साहित्यातून बनवण्यात आली आहे. या कुटीवर वारली चित्रे रेखाटली असून वारली कलेतील देऊळ, उत्सव रेखाटण्यात आले आहे.७० वर्षाहून अधिक हे कुटुंबीय गणेशोत्सव साजरा करत आहे. तर गेल्या १६ वर्षांपासून ते घरात इको- फ्रेंडली बाप्पा आणत आहेत. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करायची आणि बाप्पाचे कचऱ्यात विसर्जन करायचे. त्यामुळेच त्यांनी इको- फ्रेंडली गणेशोत्सव करायचे ठरवले.

First Published on: September 17, 2018 12:58 PM
Exit mobile version