रविंद्र चिटणीस यांच्या बाप्पांचा प्लास्टिक मुक्तीचा संदेश

रविंद्र चिटणीस यांच्या बाप्पांचा प्लास्टिक मुक्तीचा संदेश

प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणारा देखावा

परळच्या रविंद्र चिटणीस यांच्या गेल्या ४८ वर्षांपासून घरी गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यांच्या घरी पाच दिवसाचा गौरी गणपती असतो. दरवर्षी हे कुटुंब सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करतात. जेणेकरून घरी येणारे भक्त, नातेवाईक देखावा पाहून झाल्यावर एक सुंदर विचार घेतील. त्या संदेशाचा अवलंब आपल्या आयुष्यात करतील, असा या कुटुंबाचा उद्देश आहे. गेले पाच वर्ष हे कुटुंब इको फ्रेंडली गणपती बसवत आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ‘मोबाईल संवाद की विसंवाद’ आणि ‘प्रदूषणानंतरच वास्तव’ असे अनेक सामाजिक संदेश देणार देखावे तयार करत आहेत.

रविंद्र चिटणीस यांचा प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणारा ‘बाप्पा’

चिटणीस यांच्या घरी शाडूची मूर्ती आहे. चलचित्र आणि देखाव्यासाठी साहित्य म्हणून माती, आईस्क्रीम काड्या, पुठ्ठा, जलरंग आणि कागदाच्या प्रिंट असे विघटनशील साहित्यांचा वापर केला आहे.

चिटणीस यांनी सांगितले की, ”दरवर्षी आम्ही सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करतो जेणेकरून घरी येणारे भक्त , प्रेक्षक देखावा पाहून झाल्यावर एक सुंदर विचार घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेतील. पर्यावरण जपण्याचे कार्य आम्ही प्रत्येक वर्षी करतो.”

First Published on: September 14, 2018 6:25 PM
Exit mobile version