IFFI : ‘गोदावरी’ला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार

IFFI : ‘गोदावरी’ला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मराठी चित्रपट ‘गोदावरी’ला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मराठी चित्रपट अभिनेते जीतेंद्र जोशी यांना सर्वोत्तम कलाकार (पुरूष) म्हणून रजत मयूर पुरस्कार घोषित झाला. गोव्याची राजधानी पणजी इथे गेले नऊ दिवस चाललेल्या ५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीची आज रंगतदार आणि दिमाखदार सोहळ्यात सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, यांच्यासह सुप्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित, या महोत्सवाच्या विविध स्पर्धा विभागाचे ज्युरी आणि भारतीय तसेच परदेशी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते.

मराठी चित्रपट अभिनेते जीतेंद्र जोशी यांना सर्वोत्तम कलाकार (पुरूष) म्हणून रजत मयूर पुरस्कार घोषित झाला. जीतेंद्र जोशी यांना ‘गोदावरी’ चित्रपटामध्ये दिवंगत मराठी कलाकार आणि चित्रपट निर्माते निशिकांत कामत यांच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबरोबरच निखील महाजन यांचा मराठी चित्रपट ‘गोदावरी’ आणि दिग्दर्शक रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा यांच्या ‘द फर्स्ट फॉलन’ या चित्रपटात भूमिका साकारणारे ब्राझिलचे अभिनेते रेनाटा कार्व्हालो यांना परीक्षकांचा सुवर्ण मयूर विशेष पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. जेव्हा हा पुरस्कार एखाद्या चित्रपटाला जाहीर होतो तेव्हा तो त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देण्यात येतो.

गोदावरी हा चित्रपट म्हणजे एका सशक्त नदीचे अविश्वसनीय रूपकात्मक चित्रण आहे. जीतेंद्र जोशी यांनी निखिल महाजन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गोदावरी’ या चित्रपटामध्ये निशिकांत कामत या पात्राची गुंतागुंतीची भूमिका ज्या कौशल्याने साकारली आहे त्याविषयी आतरराष्ट्रीय परीक्षकांनी असे मत नोंदवले आहे की, त्रस्त झालेल्या निशिकांतचे आणि त्याच्‍या लालबुंद डोळ्यांचे चित्रण एकाचवेळी अतिशय प्रभावी आणि शोकपूर्ण केले आहे. चित्रपटात हे पात्र एकूणच अतिशय गुंतागुंतीचे असतानाही कलाकाराने चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या रागातून वाहणारे अश्रू परिणामकारक ठरतात, असे कौतुक परीक्षकांनी केले आहे.

जितेंद्र भिकुलाल जोशी यांना सूवर्ण मयूर, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये रोख यावेळी देण्यात आले.

निखील महाजन यांचा गोदावरी हा चित्रपट एका माणसाची त्याच्या गोदावरीशी असलेल्या नात्याने दिलेली प्रेरणा आणि प्रोत्साहन यातून पुरातन परंपरा आणि संस्कृती जपण्याची तात्विक आस दर्शवितो. या नदीचे २०२० मधील रूप दाखवून तिची भक्ती करणाऱ्यांचे वंशज शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चित्रपटाचे परीक्षकांनी पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. “गोदावरी हा चित्रपट म्हणजे एका सशक्त नदीचे अविश्वसनीय रूपकात्मक चित्रण आहे आणि बदलत्या काळात नद्या कशा प्रकारे विद्रूप होतात हे दाखविणारा एक मार्ग आहे” या पवित्र नदीमधील अतिप्रमाणात झालेल्या प्रदूषणामुळे तिचे पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे हे दाखविताना चित्रपटातील नायक संताप आणि अंतर्गत वादळाचा अनुभव घेतो, या चित्रपटातील प्रमुख पात्राचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या घटनांच्या माध्यमातून त्याची मनस्थिती अत्यंत समर्थपणे मंडळी आहे असे निरीक्षण परीक्षकांनी नोंदविले.

 

First Published on: November 28, 2021 7:48 PM
Exit mobile version