8 वर्षांच्या गुंजन सिन्हाने पटकावली ‘झलक दिखला जा 10’ची ट्रॉफी

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध ‘झलक दिखला जा 10’ हा कार्यक्रम मागील अनेक दिवसांपासून चर्तेत आहे. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. गुंजन सिन्हाने ‘झलक दिखला जा 10’चे विजेते पद मिळवलं आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, करण जौहर, टेरेंस लुईस आणि नोरा फतेही यांच्याहस्ते गुंजनला 20 लाख आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. नुकतेच या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

गुंजन शाळेत जाण्यासाठी उत्सुक
आता गुंजन डान्ससोबतच अभ्यासावर देखील लक्ष केंद्रित करणार आहे. तिला तिच्या शाळेमध्ये जाण्याची खूप उत्सुकता लागून राहिली आहे. ती तिच्या शाळेतील मित्र-मैत्रिणींना आणि शिक्षकांना भेटण्यासाठी उत्सुक आहे.

 

 


हेही वाचा :

बॉक्स ऑफिसवर फक्त ‘दृश्यम 2’चा बोलबाला; 9 दिवसांत केला 125 कोटींचा टप्पा पार

First Published on: November 28, 2022 9:03 AM
Exit mobile version