83 Trailer Out : रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित ‘८३’ चा ट्रेलर आउट ; २४ डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

83 Trailer Out : रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित '८३' चा ट्रेलर आउट ; २४ डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘८३’ च्या निर्मात्यांनी भारताच्या प्रतिष्ठित क्रिकेट मॅचच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले आहे. अविश्वसनीय सत्यकथा, ज्याने अकल्पनीयतेला आपल्याकडे आकर्षित केले होते, तो क्रिकेट ड्रामा २४ डिसेंबर २०२१ ला मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. कबीर खान यांच्याद्वारे दिग्दर्शित ‘८३’वर्षातला सर्वात प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट भारताच्या ऐतिहासिक १८८३ च्या विश्वकप विजयाची कहाणी आहे.

 

रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

रिलायंस एंटरटेनमेंट आणि फैंटम फिल्म्स यांच्याद्वारे कबीर खान फिल्म्स प्रोडक्शनच्या ‘८३’ ला सादर करण्यात येणार आहे. रिलायंस एंटरटेनमेंट आणि पीवीआर पिक्चर्स चा हा चित्रपट २४ डिसेंबर २०२१ ला हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड़ आणि मलयाळम मध्ये 3डी रिलीज होणार आहे.

कमल हसन यांची राजकमल फिल्म्स इंटरनेशनल, अक्किनेनी नागार्जुन यांची अन्नपूर्णा स्टूडियो, पृथ्वीराज प्रोडक्शंस यांनी चित्रपटाचे अनुक्रमे तामिळ, तेलुगु आणि मलयाळम व्हर्जनकरिता रिलायंस एंटरटेनमेंट सोबत एकत्र आले आहेत. पृथ्वीराज प्रोडक्शन आणि किच्छा सुदीपा यांची शालिनी आर्ट्स फिल्म मलयाळम आणि कन्नड व्हर्जन प्रस्तुत करण्यासाठी तयार आहेत.चित्रपटाची निर्मिती दीपिका पादुकोण, कबीर खान, विष्णु वर्धन इंदुरी, साजिद नाडियाडवाला, फैंटम फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट यांनी मिळून केली आहे.


हे ही वाचा – Amitabh Bachchan Bungalow: बिग बींच्या प्रतिक्षा बंगल्याची भिंत तोडणार? काँग्रेसची लोकायुक्तांकडे तक्रार


 

 

 

 

 

First Published on: November 30, 2021 2:04 PM
Exit mobile version