सेन्सॉर बोर्डाकडून ‘पठाण’ चित्रपटाबाबत मोठा निर्णय…

सेन्सॉर बोर्डाकडून ‘पठाण’ चित्रपटाबाबत मोठा निर्णय…

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत. दरम्यान, अशातच आता या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

सेन्सॉर बोर्डाकडून ‘पठाण’ चित्रपटाबाबत मोठा निर्णय

‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग गाण्यामुळे पेटलेला वाद आता सेन्सॉर बोर्डाकडे पोहोचला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट पाहून सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात अनेक बदल करण्यास सांगितले आहेत. ज्यात या चित्रपटातील बेशरम रंग गाण्याचा देखील सहभाग आहे. तसेच चित्रपटातील बदल पूर्ण झाल्यावर ते पुन्हा सेन्सॉर बोर्डाकडे सर्टिफिकेशनसाठी जावं लागेल. त्यामुळे आता या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला पुन्हा गाणं रिशूट करावं लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

 


हेही वाचा :

लोकांना एवढं दुःख झालंय… ‘बेशरम रंग’च्या वादावर ‘पठाण’च्या लेखकाने दिली प्रतिक्रिया

First Published on: December 29, 2022 1:24 PM
Exit mobile version