‘पतीनंतर महिलेला आपल्या अस्तित्वाची, हक्काची लढाई लढावी लागते’ शो मध्ये कमबॅक करताच शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया

‘पतीनंतर महिलेला आपल्या अस्तित्वाची, हक्काची लढाई लढावी लागते’ शो मध्ये कमबॅक करताच शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया

शिल्पा शेट्टीने चूक कबूल केली म्हणाली,मी चूकी केली पण...

बॉलिवूड अभिनेत्री शेट्टी पती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी फिल्म प्रकरणात अडकल्यानंतर टीव्ही रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर ४’पासून अनेक आठवडे दूर होती. या प्रकरणानंतर शिल्पा शेट्टीने माध्यमांसमोर येणंही टाळले. परंतु मोठ्या ब्रेकनंतर शिल्पा शेट्टीने पुन्हा एकदा सुपर डान्सर शोमध्ये कमबॅक केलेय.

सुपर डान्सर ४ च्या अपकमिंग एपिसोडसाठी शिल्पाने शूट केलं आहे. नुकताच या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला. या प्रोमोत शिल्पा शेट्टी महिलांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर भाष्य करताना दिसतेय. ‘सुपर डान्सर’च्या मंचावर राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित एक डान्स परफॉर्मन्सनंतर तिने आपले महिलांच्या आयुष्यासंबंधीत अडचणींवर मत व्यक्त केले.


यात शिल्पा शेट्टी सांगतेय की, “झाशीच्या राणी यांच्याबद्दल जेव्हा मी ऐकते तेव्हा वाटते त्या समाजाचा एक चेहरा आहेत. कारण आजही पतीनंतर महिलेला आपल्या हक्कांसाठी, अस्तित्वासाठी आणि आपल्या मुलांसाठी समाजाविरोधात लढाई लढावी लागते. लक्ष्मी बाई यांची कथा ही या सर्व महिलांना आपल्या आयुष्याची लढाई लढण्यासाठी प्रेरित करते. झाशीची राणी खरचं एक शक्तीशाली महिला होत्या. ही खरी घटना आपल्यासाठी एका इतिहास आहे. मला अभिमान आहे की, आपण एका निर्भय देशात जन्म घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीशी लढण्याची महिलांमध्ये शक्ती असते. आपल्या हक्कांसाठी त्या लढतात, याचा मला अभिमान आहे. त्या सर्व महिलांना माझा आज साष्टांग दंडवत प्रणाम.”

खूप दिवसांनंतर आता चाहत्यांना शोमध्ये शिल्पा शेट्टी दिसणार आहे. मात्र शुटिंगपूर्वी रिलीज झालेल्या एका व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसतेय. राजच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी सुपर डान्सर्सच्या मंचावर गैरहजर होती. शिल्पा शेट्टी कुंद्रा, गीता कपूर आणि अनुराग बासु शोमध्ये जज म्हणून काम पाहत आहेत.


 

First Published on: August 21, 2021 4:49 PM
Exit mobile version