९९ वर्षांच्या ‘चिरतरुण’ आजींच्या भेटीला आदेश बांदेकर पोहोचले सांगलीत

९९ वर्षांच्या ‘चिरतरुण’ आजींच्या भेटीला आदेश बांदेकर पोहोचले सांगलीत

महाराष्ट्रामधील अनेक वहिनींच्या घरचा पाहुणचार घेत गेली अनेक वर्ष आदेश बांदेकर (aadesh bandekar) होम मिस्टर (home minister) या कार्यक्रमाच्या माध्यमातून पैठणीचा शृंगार महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवत आहेत. होम मिनिस्टर हा कार्यक्रम जेव्हा सुरु झाला तेव्हा ती फक्त १३ भागांची मालिका करायची होती. पण सुरुवातीच्याच १३ भागांमध्ये या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक पसंती मिळाली आणि हा कार्यक्रम सुपर हिट ठरला. १३ भागांपासून सुरु झालेल्या मालिकेचा हा प्रवास आजतागायत अविरत सुरु आहे. या कार्यक्रमाच्या संदर्भात एक विशेष घटना घडली आणि त्यासाठी आदेश बांदेकर हे थेट सांगली (sangli) मध्ये पोहोचले होते.

होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर यांना मोठया प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. महाराष्ट्रातील घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनात आदेश बांदेकर यांचं हक्काचं स्थान सुद्धा आहे. आदेश बांदेकर हे ९९ वर्षांच्या आजींना पैठणी देण्यासाठी  थेट सांगलीमध्ये पोहोचले होते. टीव्हीवर होम मिनिस्टर (Home Minister) कार्यक्रम लागल्यावर आदेश बांदेकरांना (aadesh bandekar) त्यात पाहून ते प्रत्यक्षातच आपल्या समोर आहेत अशी कल्पना करून गाणं म्हणणाऱ्या नलिनी जोशी या ९९ वर्षांच्या आजींना भेटण्यासाठी आदेश बांदेकरांनी थेट सांगली गाठलं.

गेल्या १८ वर्षांपासून महाराष्ट्रातील आणि भारतातील सगळ्या वहिनींचा पैठणी देऊन सन्मान करत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करणारा कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर. या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर यांना आदेश भाऊजी ही ओळख महाराष्ट्रात मिळाली. आदेश बांदेकर वहिनींच्या घरी जाऊन त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधून आपुलकीने त्यांची विचारपूस देखील करतात. त्यामुळे आदेश बांदेकर यांचे आणि होम मिनिस्टर कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. अशाच ९९ वर्षांच्या आजी सुद्धा या कार्यक्रमाच्या चाहत्या आहेत. होम मिनिस्टर पाहत आदेश भाऊजी प्रत्यक्ष आपल्या समोर आहेत अशी कल्पना करून त्या गाणं सुद्धा गातात. याच आजींची भेट आदेश भाऊजींनी घेतली. निमित्त होतं ते आजींच्या १०० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या सोहळ्याचं. यावेळी आदेश बांदेकरांना प्रत्यक्ष समोर पाहून आजींच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव होते. त्यावेळी आदेश बांदेकरांनी पैठणी देऊन आजींचा सन्मान केला.

काही दिवसांपूर्वी आजींचा गाण्याचा व्हिडीओ पाहून आदेश बांदेकर यांनी आजीचं कौतुक कारण्यासाठी सांगलीला येईन असे आश्वासन दिले होते. आणि ते पाळले सुद्धा. ९९ वर्षाच्या नलिनी जोशी(nalini joshi)आजींनी त्यांची गाण्याची आवड आणि गोडी जपली आहे. भक्तीगीत, नाट्यगीत आणि भावगीत जोशी आजी अजूनही आवडीनं सुरेल आवाजात गाणी गातात. आदेश बांदेकरांना प्रत्यक्षात पाहूनआजींच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता. आदेश बांदेकरांनाही आजींना भेटून खूप बरं वाटलं. त्यावेळी त्यांनी आजींशी मनमोकळ्या गप्पा सुद्धा मारल्या. तुम्हाला भेटून आईची आठवण आली असं म्हणत आदेश बांदेकर सुद्धा भावूक झालेले पाहायला मिळाले. संपूर्ण वातावरणच गहिवरून गेले होते. सध्या या कार्यक्रमाचं महामिनिस्टर हे पर्व सुरु आहे. या पर्वाच्या विजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार आहे.

या कार्यक्रमाच्या वेगळेपणामुळेच हा कार्यक्रम एवढी वर्ष सातत्याने प्रेक्षक पसंतीस उतरत आहे. होम मिनिस्टर (homा minister) या कार्यक्रमात नेहमीच भावनिक आणि आनंदी क्षण प्रेक्षकांना पहायला मिळतात. एक कथाबाह्य कार्यक्रम असून सुद्धा या कार्यक्रमाने अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यातच आदेश बांदेकर (aadesh bandekar) यांचा हसरा चेहरा आणि उत्तम संवाद कौशल्य आणि कार्यक्रमाचे कॅमेरा मागचेही तंत्रज्ञ या सर्वांमुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या घरघरात पोहोचला आहे. आणि प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.

First Published on: May 30, 2022 8:22 PM
Exit mobile version