२८ वर्षांनंतर ‘या’ चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार शाहरुख-आमिरची जोडी

२८ वर्षांनंतर ‘या’ चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार शाहरुख-आमिरची जोडी

लालसिंह चड्ढा या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी अशा चर्चांना उधाण आले होते की, बॉलिवूडचा किंगखान शहारूख खान अमिर खानच्या चित्रपटाची शूटिंग करणार आहे. तर शाहरुख खानने या चित्रपटासाठी एक कॅमिओ शूटही केले आहे. असे सांगितले जात आहे की, शाहरुखचा हा सीन स्वत: आमिर खानने दिग्दर्शित केला आहे.

शाहरुख आणि आमिर खान हे दोघे यापूर्वी १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘पहला नशा’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसले होते. दरम्यान तब्बल २८ वर्षानंतर आमिर आणि शाहरुख पुन्हा एकत्र मोठ्या पडद्यावर काम करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. दुबईला जाण्यापूर्वी शाहरुखने आमिरच्या चित्रपटासाठी कॅमिओचे शूट केले आहे. शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज लालसिंह चड्ढा या चित्रपटाच्या व्हीएफएक्सचे काम करत आहे.

लाल सिंह चड्ढा हा चित्रपट शेवटच्या टप्प्यात असून हा चित्रपट लवकरच तयार होऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टॉम हँक्सचा ‘फॉरेस्ट गंप (१९९४)’ चा ऑफिशिअल रिमेक ‘लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha)’ या चित्रपटाला अतुल कुलकर्णीने लिहिले आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती व्हायकॉम १८ स्टुडिओ आणि आमिर खान प्रोडक्शन्स करत आहेत. पुढच्या वर्षी २०२० च्या ख्रिसमसच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.


अभिनेत्री पल्लवी पाटील पहिल्यांदाच डेली सोपमध्ये

First Published on: November 9, 2020 4:33 PM
Exit mobile version