‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’च्या तिकिटांचे दर वाढवल्याने आमिर नाराज

‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’च्या तिकिटांचे दर वाढवल्याने आमिर नाराज

Thugs of Hindostan

दिवाळीच्या निमित्ताने ठग्ज ऑफ हिंदुस्तान हा बिग बजेट सिनेमा प्रदर्शीत होत असून त्याच्या तिकिटाची दरवाढ केल्याबाबत अभिनेता आमिर खान याने नाराजी दर्शवली आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी दिग्दर्शीत केलेला हा मल्टिस्टारर चित्रपट या वर्षातील सर्वात महागडा सिनेमा म्हणून ओळखला जात आहे. तब्बल २४० कोटी रुपये बजेटचा हा चित्रपट आहे. त्यामुळे दिपाळीच्या सुट्ट्या आणि विकेंडचा फायदा या चित्रपटाला होईल असे म्हटले जात आहे. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी सिनेमागृहात खेचण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असणार आहे. मात्र याचा फायदा घेत आता चित्रपटाच्या तिकिट दरात १० टक्क्यांनी वाढ केल्याचे समोर येत असून त्यामुळे आमिर खान नाराज झाला आहे.

काय म्हणाला आमिर खान 

याबाबत बोलताना आमिर खान म्हणाला की, मी समजू शकतो. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. मात्र मी नेहमीच चित्रपटाच्या तिकिटांचे दर कमी ठेवण्याच्या मताचा आहे. मला नेहमीच अस वाटत की आपले थिएटर के प्रेक्षकांच्या सोयीचे आणि स्वस्त असायला हवेत. त्यामुळे लोकांना थिएटरमध्ये येऊन चित्रपटाचा आनंद घेता येईल. माझ एक स्वप्न आहे की भारतात असे चित्रपटगृह असावेत जे इकॉनॉमिकल, मीडल आणि पोश ग्रुपनुसार असावेत. प्रत्येकाला चित्रपट पाहण्याचा हक्क आहे. मला खात्री आहे एक दिवस हे नक्की होईल.

का वाढवले दर

बिग बजेट चित्रपट असल्यामुळे मेकर्सने प्रॉफिट कमवण्यासाठी टिकिटांच्या किंमती वाढवल्या आहेत. पंरतू दर वाढवल्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे पाठ फिरवण्याचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आयुष्मान खुराना यांचा बधाई हो चित्रपटाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

First Published on: November 7, 2018 6:31 PM
Exit mobile version