Video: नैराश्यानंतर ‘या’ समस्येचा सामना करतेय आमिर खानची मुलगी इरा

Video: नैराश्यानंतर ‘या’ समस्येचा सामना करतेय आमिर खानची मुलगी इरा

बॉलिवूड अभिनेचा आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ग्लॅमरस फोटोंसोबतच इरा चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट्स देत असते. इरा अनेक वेळा तिच्या नैराश्याबद्दल मानसिक आरोग्याबद्दल बोलताना दिसली आहे. आता अलीकडेच इराने एक व्हिडिओ पोस्ट केलाय, त्याने तिने असे सांगितले की, तिचे औषध बदलण्यात आले, त्यानंतर तिची तब्येत बरी नाही. इरा खान मानसिक आरोग्याबद्दल बोलतांना म्हणाली, जेव्हापासून तिला समजले की ती डिप्रेशनमध्ये आहे. त्यानंतर तिने शनिवारी तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ १० मिनिटांचा आहे, ज्यामध्ये ती तिच्या फॉलोअर्सला त्याच्या प्रकृतीबद्दल सांगताना दिसते.

अलीकडेच, इरा खानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने म्हटले की, तिला खूप राग येत आहे आणि या साऱ्या समस्येला कसे सामोरे जावे हे समजत नाही. इराने पुढे असेही सांगितले की, तिला साधा-सुधा राग येत नाही, मी माझ्या मानसोपचारतज्ज्ञांशी देखील संवाद साधला आहे. इरा खानने तिच्या चाहत्यांसाठी १० मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. इरा ने सांगितले आहे की तिला बऱ्याच दिवसांपासून खूप राग येत आहे हे सहसा तिच्या बाबतीत कधीच घडले नव्हते. तिला तिच्या रागाचा सामना कसा करावा हे माहित नसल्याने कधीकधी लाज देखील वाटत असल्याचे तिने सांगितले.

शुक्रवारी इरा ड्रायव्हिंग करून घरी जात होती पण ती घराच्या दिशेने गेलीच नाही. ती गाडी चालवत होती जेव्हा तिला कळले की ती रागावलेल्या अवस्थेत आहे आणि स्वतः गाडी चालवण्याच्या स्थितीत नाही. त्यावेळी तिने कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती. तेव्हा कोणीतरी तिला उचलण्यासाठी आले तेव्हा ती फक्त रडत असल्याचे इराने सांगितले.


सामंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटासाठी कंगनाने आमिर खानला ठरवले दोषी!
First Published on: October 3, 2021 1:24 PM
Exit mobile version