चीनमध्ये बनणार आमिर खानच्या ‘या’ चित्रपटाचा रिमेक!

चीनमध्ये बनणार आमिर खानच्या ‘या’ चित्रपटाचा रिमेक!

आमिर खान

मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा तारे जमीन पर हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देशभरात डिस्लेक्सिया या आजाराबद्दल जागरूकता पसरवली होती. ८ वर्षाच्या ईशान अवस्थी या मुलाला चित्रपटात डिस्लेक्सिया या आजाराने ग्रासले होते. त्याच्या भोवती फिरणाऱ्या कथानकामुळे प्रेक्षकांना हा चित्रपच भावला होता. या चित्रपटाचे भारतातच नाही तर चीनमध्येही चाहत्यांनी प्रेम आणि कौतुक केले.

तारे जमीन पर हा चित्रपट चीनमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळवणारा चित्रपट ठरला होता. भारतापेक्षा चीनमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांनी अधिक पसंती दर्शविल्याने चीनमध्ये हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. बॉलिवूडचे काही चित्रपट चीनमध्ये बॉक्स ऑफिसवर कमाल करताना दिसत आहे. अशातच आमिर खानच्या या चित्रपटास सर्वाधिक लोकप्रियता मिळून देखील तो चीनमध्ये प्रदर्शित केला गेला नव्हता. म्हणून या चित्रपटाचा चीनी रिमेक तयार केला जाणार आहे.


आमिर खानच्या 3 इडियट्स, दंगल, सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटांनी चीनमध्ये मोठी कमाई केली होती. यामुळे आमिरला चीनमध्ये सर्वाधिक पसंतीचा अभिनेता बनला होता. परंतु हा चित्रपट अधिकृतरित्या प्रदर्शित केला नाही. २०१० मध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवल्याने चाहत्यांनी पसंती दर्शविली होती. चीनमध्ये कोणताही दोन वर्षापेक्षा जुना चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकत नाही म्हणून आता तारे जमीन पर पहिल्यांदा असा बॉलिवूड चित्रपट असणार आहे ज्याचा चीनमध्ये रिमेक तयार करण्यात येणार आहे.

First Published on: May 17, 2019 11:36 AM
Exit mobile version