Aarya 2 : माधुरी दीक्षितने सादर केला ‘आर्या’च्या पहिल्या सीझनचा रिकॅप व्हिडिओ

Aarya 2 : माधुरी दीक्षितने सादर केला ‘आर्या’च्या पहिल्या सीझनचा रिकॅप व्हिडिओ

Aarya 2 : माधुरी दीक्षितने सादर केला 'आर्या'च्या पहिल्या सीझनचा रिकॅप व्हिडिओ

राम माधवानी दिग्दर्शित आर्या सीझन २ लवकरट डिस्नी + हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.जेव्हा या सुष्मिता सेन स्टारर एक्शन ड्रामाचा पहिला सीझन समोर आला तेव्हा तो सर्वांनाच खूप आवडला होता आणि आता सीझन 2 येत असून त्याचा नेत्रदीपक ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.बहु-प्रतिभावान अभिनेत्री माधुरी दीक्षित आर्याच्या पहिल्या सीझनच्या हायलाइट्सकडे पुन्हा घेऊन जाते आहे. धकझक गर्ल माधुरी दीक्षितने तिच्या अभिनयाने आणि अमर्याद सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.दरम्यान,माधुरीने पहिल्या सीझनच्या कथनाने सर्व चाहत्यांना पहिल्या सीझनमध्ये त्यांनी अनुभवलेल्या उत्सुकतेची पुन्हा एकदा जाणीव करून दिली.

सीझन टू च्या टीझरमध्ये सुष्मिताची खतरनाक स्टाइल पाहिल्यानंतर आता ट्रेलरही जबरदस्त आहे. ही बहुप्रतिक्षित वेबसीरीज १० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘आर्या २’ या वेबसिरीजचा टीझरमधील सुष्मिताचा फर्स्ट लूक हा अतिशय खतरनाक दाखवण्यात आला.त्यामुळे तिची भूमिका आक्रमक दिसत आहे. टीझर शेअर करताना आर्याचे वर्णन सिंहिणी असे केले आहे. पहिल्या सीझनच्या शानदार यशानंतर, डिज़्नी+ हॉटस्टार, हॉटस्टार स्पेशल, आर्याचा आणखी एक रोमांचक आणि जबरदस्त हंगाम घेऊन येत आहे.

सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरीजसाठी आंतरराष्ट्रीय एमी नामांकन मिळवणारा सर्वात मनोरंजक थ्रिलर बनल्यानंतर, आर्या त्याच्या सीझन २ सह डिजिटल स्क्रिनवर परतत आहे.ट्रेलरमधील अनेक मनोरंजक ट्विस्ट्समुळे या सीरिजच्या दुसऱ्या भागाविषयी सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.


हे ही वाचा – Cabinet decision: नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधकामासाठी निधी, राज्य मंडळाचे ६ मोठे निर्णय


 

 

First Published on: December 8, 2021 3:52 PM
Exit mobile version