आयुषमान म्हणतो, ‘मर्द को भी दर्द होता है’

आयुषमान म्हणतो, ‘मर्द को भी दर्द होता है’

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना

‘मर्द को कभी दर्द नही होता’ असा विचार पुरुषप्रधान संस्कृतीत गेली कित्येक वर्षे रुढ झालेला आहे. मुली या रडणाऱ्या तर मुलं हे कधीही न रडणारे असतात असा समज लहानपणापासूनच मुला-मुलींच्या डोक्यात घुसवला जातो. पुरुष हा कुटुंबप्रमुख असून त्याने नेहमीच कणखर राहिले पाहीजे, असा दबाव समाज सतत टाकत असतो. अभिनेता आयुषमान खुरानाने समाजात रुढ असलेल्या अनेक विषयांवर आपल्या चित्रपटातून दमदार भाष्य केले आहे. कणखर पुरुषात्वाच्या व्याख्येला छेद देणारी एक कृती आयुषमानने सध्या केली आहे.

‘दी मॅन कंपनी’ ही खास पुरुषांसाठीचा ग्रूमिंग ब्रँड असून पुरुषांबदलच्या टिपिकल विचार बदलण्याचा उद्देश ठेवून काम करते. १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आहे, या निमित्ताने दी मॅन कंपनी आणि आयुषमान खुराना एकत्र येऊन लोकांना आपल्या आतील जंटलमनला बाहेर काढण्यास (Bring out the #Gentlemaninyou) आवाहन करत आहे. आयुषमान नेहमीच रूढीवादी गोष्टींवर मात करण्यासाठी ओळखला जातो. ज्या गोष्टींबद्दल खुल्लेपणाने बोलत नाहीत, अशा गोष्टीवर त्याने चित्रपट केले आहेत. मग विकी डोनर, बधाई हो, शुभ मंगल सावधान.. अशा अनेक चित्रपटातून त्याने वेगळे विषय हाताळले आहेत.

‘मुलं स्ट्राँग असतात ते कधी रडत नाहीत’, ‘तू मुलगा आहेस, तुला गाडी चालवायला यायलाच पाहीजे’ हे सगळे जे विचार आहेत, ते अनेक वर्षांपासून सगळ्यांना सांगितले गेलेत. मात्र आता पुरुषांबद्दलची धारणा बदलली आहे. टिपिकल विचारांमुळे पुरुषांनी एका विशिष्ट प्रकारे वागणं अपेक्षित असतं. आयुष्मानने सादर केलेल्या कवितेत पुरुषांच्या रुढीवादी विचारशैलीवर भाष्य करण्यात आले आहे. ‘मर्द को भी दर्द होता हैं’ असं तो या कवितेत म्हणतो. पुरुष म्हणजे दणकटच असला पाहिजे, या गैरसमजुतीला बदलण्याची गरज असल्याची ही कविता सांगते. कवितेतून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. समाजात अनेक गोष्टी काहीही विचार न करता सहजचं स्वीकारल्या जातात, जे चुकीचं आहे.

दी मॅन कंपनीची ही अर्थपूर्ण कविता समाजात असलेल्या टिपिकल विचारांवर हल्ला करत पितृसत्ताक विचारांतून बाहेर पडण्याचे आवाहन करते.

First Published on: November 13, 2019 6:28 PM
Exit mobile version