Video: आयुषमानचा गे रोमान्स ड्रामा,‘शुभ मंगल ज्यादा सावधान’!

Video: आयुषमानचा गे रोमान्स ड्रामा,‘शुभ मंगल ज्यादा सावधान’!

आयुषमान खुरानाचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. गे लव्हस्टोरीवर आधारीत हा चित्रपट आहे. या आधी २०१८ साली अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांच्या ‘दोस्ताना’ या चित्रपट असाच काहीसा होता. आता पुन्हा एकदा आयुषमान याच धर्तीवर ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट घेऊन येत आहे.

आयुषमानने या चित्रपटाचा ट्रेलर ट्विट करून याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे. “शुभ मंगल सावधान या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता आम्ही ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट घेऊन तुमच्या भेटीस येत आहोत. आम्ही यावेळी खूप मेहनत केली आहे. तुम्ही देखील थोडे अधिक प्रेम द्या.” अशा आशयाचे ट्विट आयुषमानने केले आहे.

एकापाठोपाठ एक असे सात हिट चित्रपट दिल्यानंतर आयुषमानचा हा कॉमेडी सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल याचा अंदाज चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच येत आहे. होमोसेक्शुयालीटीवर आधारीत या चित्रपटात गे लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. यातील पात्र, डायलॉग खूप इन्स्टेरस्टींग आहेत. त्यात आयुषमानला पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

या चित्रपटात आयुषमानबरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल राय देखील झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्य याने केले आहे. येत्या २१ फ्रेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

First Published on: January 21, 2020 8:52 AM
Exit mobile version