‘या’ एकमेव मराठी चित्रपटाची ‘मामी’मध्ये वर्णी

‘या’ एकमेव मराठी चित्रपटाची ‘मामी’मध्ये वर्णी

अबाऊट लव्ह

यंदा मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजेस(मामी) द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या मुंबई फिल्म फेस्टिवलचे हे २१ वे वर्ष आहे. भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानला जाणारा मामी मुंबई फेस्टिवलच्या बहुचर्चित इंडिया गोल्ड विभागातील चित्रपटांची यादी प्रदर्शित झाली. या विभागात भारताच्या विविध भागांत बनवण्यात आलेल्या दहा दर्जेदार चित्रपटांचा समावेश आहे. यंदाच्या दहा चित्रपटांतून भारतातील बहुविविधतेचे सेल्युलाईड दर्शन ही प्रेक्षकांसाठी अनोखी मेजवानी ठरणार आहे. पहाडी, मैथिली, आसामी, नेपाळी, हिंदुस्थानी आणि बंगाली या भाषांनी यंदाच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

२०१५ मध्ये ‘कोथानोडी’ या चित्रपटाद्वारे मामी फेस्टिवलमध्ये स्थान मिळवलेल्या भास्कर हजारिका यांनी त्यांच्या ‘आमीस’ या चित्रपटाद्वारे यंदा पुनरागमन केलं आहे. या चित्रपटाचा आशिया विभागाचा प्रीमियर मामी महोत्सवादरम्यान होणार आहे. २००९ मध्ये ‘सागर सेतू’ या लघुपटासाठी सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार मिळवणाऱ्या अर्चना अतुल फडके यांचा ‘अबाऊट लव्ह’ हा मराठी माहितीपटही यंदा मामी फेस्टिवलमध्ये दमदार एंट्री करणार आहे.

पुष्पेंद्र सिंग यांचा ‘मरू रो मोती’ (वाळवंटातले मोती), अचल मिश्रा यांचा ‘गमक घर’ आणि सौरव राय यांचा ‘निमतोह’ (निमंत्रण) हे तीन चित्रपट गोल्ड विभागात जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहेत. गीतांजली राव यांचा ‘बॉम्बे रोज’ आणि किश्ले यांचा ‘ऐसे ही’ या चित्रपटांसह सहा चित्रपट मामी फेस्टिवलमधून भारतात प्रदर्शित होणार आहेत.

यंदाच्या मामी फेस्टिवलमध्ये चित्रपट गोल्ड विभागात ‘हे’ १० चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

१) अबाऊट लव्ह
दिग्दर्शक – अर्चना अतुल फडके

२) बिटर चेस्टनट
दिग्दर्शक – गुरविंद सिंग

३) बॉम्बे रोज
दिग्दर्शक – गीतांजली राव

४) ईब अले ओ!
दिग्दर्शक – प्रतीक वॅट्स

५) गमक घर
दिग्दर्शक – अचल मिश्रा

६) निमतोह
दिग्दर्शक – सौरव राय

७) जस्ट लाईक दॅट
दिग्दर्शक – किस्ले

८) मरू रो मोती
दिग्दर्शक – पुष्पेंद्र सिंग

९) आमीस
दिग्दर्शक – भास्कर हजारिका

१०) दॅट कॉल्ड नेवर लेफ्ट
दिग्दर्शक – यशस्विनी रघुनंदन

First Published on: September 19, 2019 5:37 PM
Exit mobile version